गणरायाच्या स्वागताला भक्तांची रिघ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 10, 2021

गणरायाच्या स्वागताला भक्तांची रिघ.

 गणरायाच्या स्वागताला भक्तांची रिघ 

गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः महापूर, कोरोनासारख्या नकारात्मक बाबींचा ताण मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणार्‍या लाडक्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी  बाजारपेठेत सजावट व पूजेच्या साहित्य खरेदीला उधाण आले आहे. दिवाळीनंतर तब्बल आठ महिन्यांनी रस्त्यावर एवढी गर्दी आणि नागरिक व बाजारपेठेत अमाप उत्साह दिसून आला. दुसरीकडे घराघरांत आरासाच्या मांडणीची लगबग सुरू आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे. बाप्पांच्या आगमनासाठी  बाजारपेठेत मखर, आसन, विद्युतमाळा, झुरमुळ्या, फुलांच्या माळा, वेली, झुंबर, तोरण, पडदे अशा साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरातील  प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे ,तर नेवासा फाटा येथील आंबेडकर चौक ,राजमुद्रा चौक येथे पूजेच्या साहित्यांची रेलचेल आहे. त्यामुळे  रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.
दुसरीकडे घराघरांत सजावट, आरासाच्या साहित्यांची मांडणी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी सांभाळून, जपून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढून ते स्वच्छ करणे, त्यातील खराब झालेले साहित्य बाजूला काढून यंदाची आरास कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. काही घरांमध्ये तर मांडणीही पूर्ण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या सूचना, आदेशांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन  नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार  यांनी  केले आहे.  आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे तसेच या काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here