मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना 100% सुरू करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना 100% सुरू करा

 मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना 100% सुरू करा

बागवान, आतार, तांबोळी, रंगरेज, काकर, कुरेशी, पिंजारी समाजांची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, मानस योजना या चार योजना राबवण्यात आल्या. यामध्ये थेट आणि मुदत कर्ज योजनांद्वारे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत होता. मात्र सन 2000 पासून ते 2017 पर्यंत या योजना कुठल्या वर्षी चालू होत्या तर कुठल्या वर्षी बंद पडल्या. 2017 ते आजतागायत शैक्षणिक कर्जाव्यक्तिरिक्त कुठल्याही योजना सुरू नाहीत. त्या योजना शंभर टक्के सुरू कराव्यात अशी मागणी बागवान, आतार, तांबोळी, रंगरेज, काकर, कुरेशी, पिंजारी समाजांच्या प्रमुखांनी केली आहे.
अल्पसंख्याक समाजाचा विकास व्हावा, समाजातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सरकारने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून थेट कर्ज आणि मुदत कर्ज योजना सुरू केल्या.
या कालावधीत पाच योजनेच्या माध्यमातून 80494 लाभार्थींना 431 कोटी 23 लाख 92 हजार रुपये वितरीत करण्यात आले. 2015 पासून या योजना बंद झाल्या असून, या योजना पुन्हा सुरू होतील, या अपेक्षेवर अल्पसंख्याक समाज आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकार सत्तेवर होती तर आता महाविकास आघाडी सरकार आहे. या दोन्ही सरकारने अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
या प्रश्नाकडे अल्पसंख्याक समाजातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सरकारकडे मागणी करून या महामंडळाला ऊर्जितावस्था आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे खूपच गरजेचे असल्याची मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे  राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, बेलापुर शहराध्यक्ष अनिस तांबोळी, पत्रकार शफीक बागवान, शाहरुख बागवान,  नजीरभाई मुलाणी, अबुभाई कुरेशी, हाजी रफीक बागवान, अकबरभाई बागवान, रफीक बागवान, जाकीरहुसेन बागवान, शफीक आतार, फरीद तांबोळी, मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इब्राहीम कुरेशी, इस्माईल बागवान, असिफ पिंजारी, अहमद रंगरेज, मुसा रंगरेज, आलम तांबोळी, दादाभाई  अन्सारी, कय्युम नालबंद, दगडू पिंजारी, साजिद मणियार, शहेबाज रंगरेज, आसिफ बागवान, मोहसीन तांबोळी, मुशताक आतार, आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment