राज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 1, 2021

राज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा.

 राज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा.

थोडे दिवस थांबा! तुमचे प्रश्न सुटतील


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी तुमचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहणार नाही. त्यामुळे थोडे दिवस फक्त थांबा, खा.विखेच्या या सूचक वक्तव्यावरून  महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याचा सूूचक इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी दिलाय. राज्यात दिवाळीनंतर भाजपचे सरकार येईल, असा आशावाद नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जतमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले रोहित पवार यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असलेल्या डॉ. सुजय विखेंनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील कर्जत पंचायत समिती मध्ये तालुका आढावा बैठकीत खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी उपस्थित काही नागरिकांनी प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याची तक्रारी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडे केली. त्या तक्रारीला उत्तर देताना खा.विखेनी राज्य शासनावरही टीका केली.
यावेळी बोलताना खा.विखे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये वाटले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणार्‍यांना 50 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. परंतु ती केवळ कागदावरच राहिली असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाला, असल्याची टीका  विखे यांनी केली. खा.विखे यांनी उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी करोना लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला आणि त्यानंतर पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोल, गटविकास अधिकारी नानासाहेब आगळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश कुराडे, वन विभागाचे अधिकारी केदार मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, अनिल दळवी, काकासाहेब ढेरे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here