व्यावसायिक, शेतकरी यांना राज्य सरकारने मदत करावी- शिवाजी कर्डीले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

व्यावसायिक, शेतकरी यांना राज्य सरकारने मदत करावी- शिवाजी कर्डीले.

 व्यावसायिक, शेतकरी यांना राज्य सरकारने मदत करावी- शिवाजी कर्डीले.

चिखलातून पायी चालत पूरग्रस्तांच्या जाणून घेतल्या व्यथा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नगर तालुक्यातील बाईजाबाई परिसरात हाहाकार माजविला. ढग फुटी म्हणजे काय याचा अनुभव ग्रामस्थांनी अनुभवला व्यावसायिकांच्या दुकानात पाणी घुसल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पीक पाण्याखाली गेली. व्यापारी व शेतकरी संकटात सापडले असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पूरग्रस्त ठिकाणी भेटी देऊन त्यांचे दुःखांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने व्यावसायिकांना 1 लाख रुपये तर शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
कर्डिले यांनी जेऊर बायजाबाई येथे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर तसेच घराघरात जाऊन दुचाकीवरून प्रवास करीत शेतकर्‍यांचा समवेत संवाद साधला व शेतकर्‍यांना धीर दिला तसेच पुरातून व चिखलातुन पायवाट काढत पूर परिस्थितीचा ठिकाणी दाखल होऊन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या व राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी विनंती केली. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस ढगफुटीसदृश पाऊस होता. यामुळे जेऊर परिसरातील 12 वाड्या वस्त्यांवर पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला त्यामध्ये वाड्या वस्त्यांना जोडणारे पूल वाहून गेले. याच बरोबर शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच जेऊर बाईजाबाई गावामध्ये व्यवसाय करणार्‍या दुकानदारांच्या दुकानात मध्यरात्री पुराचे पाणी घुसले त्यामध्ये व्यावसायिकाच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापारी व शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच अण्णासाहेब मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, मधुकर मगर, विकास कोथंबिरे, गणेश तवले, बंडू पवार, सुनील ससे, आदिनाथ बनकर, बाप्पू तवले, गणेश शिंदे, नंदू तवले, सागर मगर, गौरव बनकर, अनिल ससे, राम पानमळकर, मयूर पाखरे, दिनेश बर्डे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment