सुपा गावासाठी निधी कमी पडू देणार नाही ः शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

सुपा गावासाठी निधी कमी पडू देणार नाही ः शेळके

 सुपा गावासाठी निधी कमी पडू देणार नाही ः शेळके

सुपा येथे 55 लाखांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  सुपा हे विकसीत मोठी बाजारपेठ आहे तेव्हा या गावाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांनी  केले.
पारनेर तालुक्यातील सुपा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना शेळके  बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती उमेशराव परहर हे उपस्थित होते.
सुपा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व विविध योजनातुन चालू आसलेल्या विकास कामाचे लोकार्पन सोमवारी पार पडले. सुपा गावात तीन ठिकाणी प्रत्येकी सहा लाख रुपये किमतीचे तीन वाँटर फिल्टर बसवण्यात आले. यात दलित वस्ती, बाजारतळ, दलित वस्ती गोडावून व दलित वस्ती, संभाजी नगर या तीन ठिकाणी वाँटर फिल्टर कार्यान्वित केले. तसेच सुमारे सत्तावीस लाख रुपये किमतीच्या चार रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ ही करण्यात आला.तर संभाजी नगर भागात सुमारे अडीच लाखा रुपये खर्चाच्या  ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सभापती परहर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगले कामे चालू आहेत. त्यासाठी भरीव सहकार्य केले जाईल. यावेळी शेळके व परहर या दोन्ही  मान्यवरांनी शाळाखोल्या व आरोग्य केंद्रासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असेही सांगितले. यावेळी सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे, उपसरपंच सागर मैड, पंचायत समितीचे माजी सभापती  दिपक पवार, उद्योजक  योगेश रोकडे, ग्रामपंचायत सदस्य  दत्तात्रय पवार, प्रताप शिंदे, माजी सरपंच विजय पवार, विलास पवार, अनिता पवार,  सुरेश नेटके, स्वपनिल घुले, संतोष रोकडे, संतोष गायकवाड, डॉ. मगर, बाबुराव औचिते, ऋषी दिघे, राजु गवळी, राहुल नांगरे, दत्तात्रय टकले, किरण आनंदकर, वंसत पवार, राहुल पवार, कृष्णा कोल्हे, निखिल पवार, शिवराज शितोळे, शहाजी नांगरे, सचिन वाढवणे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment