तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी शरद रसाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी शरद रसाळ

 तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी शरद रसाळ

भोयरे गांगर्डा येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी सचिन थोरात यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. ग्रामस्थांच्या आरोग्य विषयी चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोरणा संसर्ग कमी झाला असून संपलेला नाही याविषयी जनजागृती करण्यात आली.
थकित वीज बिल झाल्याने महावितरणने स्टेट लाईट बंद केल्या  असून पाणीपुरवठा विहिरीचा विद्युत पुरवठा देखील खंडित केला होता मात्र त्याचे वीजबिल ग्रामपंचायतीने भरल्याने तो पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. स्टेट लाईट यासह इतर विकास कामे व देखभालीसाठी ग्रामस्थांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे असे आव्हानही ग्रामसभेत करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय पवार तर उपाध्यक्षपदी पत्रकार शरद रसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्राम रोजगार सेवक निवडणे यादरम्यान संपत पाडळे, राजेंद्र रसाळ, सुभाष रसाळ या तिघांचे अर्ज दाखल झाले होते यामध्ये राजेंद्र रसाळ यांची सर्वानुमते ग्रामरोजगार सेवक पदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अनिता भोगाडे, उपसरपंच सुधीर पवार, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत सातपुते, कांचन किशोर रसाळ, अश्विनी रवींद्र भोगाडे, आदिनाथ गायकवाड, रोहिनी रामचंद्र गांगड, माजी सरपंच भाऊसाहेब विठ्ठल भोगाडे, भाऊसाहेब चांगदेव भोगाडे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, माजी अध्यक्ष दादासाहेब रसाळ, संचालक आप्पासाहेब रसाळ, प्रदीप रसाळ, शरद पवार, सुभाष भोगाडे, अशोक रसाळ, अंगणवाडी सेविका आशा रसाळ, मुख्याध्यापिका मंदा साबळे, कृषी सहाय्यक भुजबळ, कामगार तलाठी संतोष मांडगे, वायरमन अमोल विटेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment