एटीएम क्लोन करून लाखो रुपये लुटणारा नटवरलाल गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

एटीएम क्लोन करून लाखो रुपये लुटणारा नटवरलाल गजाआड.

 एटीएम क्लोन करून लाखो रुपये लुटणारा नटवरलाल गजाआड.

अहमदनगर सायबर पोलिसांची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम मधून लाखो रुपये काढणार्‍या एका वॉन्टेड नटवरलाल ला अहमदनगर सायबर टीमने ठाणे जिल्ह्यातील वसई विरार मधून ताब्यात घेतले आहे. सुजित राजेंद्र सिंग वय 44 हे आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील मिर्झापुर जिल्ह्यातील कचवा गावचा रहिवासी आहे.त्याने गुन्हयाची कबूली देवून त्याचेकडून गुन्हयात वापलेला एक लॅपटॉप, 5 मोबाईल हॅण्डसेट, एक कॉम्प्युटर, 7 पेनड्राईव्ह 4 -ढच् कार्ड क्लोन करण्याकरीता लागणारे स्किमर मशिन, एक कलर प्रिंटर, 54 बनावट ए.टी.एम कार्ड, 46 कोरे बनावट कार्ड -ढच् कार्ड तयार करण्यासाठी लागणारे, 6 विविध कंपन्याचे सिम कार्ड असा 47400/- रू.कि. चा मुंददेमाल मिळून आला आहे. या आरोपी याचेवर यापूर्वी अहमदबाद, सुरत गुजरात, मुंबई येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस गुन्हयात अटक करून मा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.  सदर घटनेची हकीकत अशी की, दि 11 मे 2021 यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांचे दुसरे एटीएम बनवुन ते वेगवेगळया एटीएम मध्ये वापरुन त्यामधुन फिर्यादी व साक्षीदार यांचे पैसे काढून 1,44,000/- रु फसवणुक केल्याचा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाले नंतर मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी पोहेकॉ योगेश गोसावी, पोहेकॉ उमेश खेडकर, पोना दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते पोकॉ. अरूण सांगळे, गणेश पाटील चापोहेकॉ वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने या गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने -ढच् मधील उउढत फुटेज ताब्यात घेवून त्याव्दारे आरोपींचा नगर कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धिरज अनिल मिश्रा, सुरज अनिल मिश्रा रा नायगाव मुंबई यांना टोकावडे ता ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले होते या आरोपी कडून 31 बनावट -ढच् कार्ड, 2,61,500/- रू. हस्तगत करण्यात आले होते. या आरोपीने त्यांचा मुख्य साथीदार सुजित राजेंद्र सिंग रा. वसई जि. पालघर याचे सांगणेवरून गुन्हा केल्याचे सांगीतले तेंव्हा पासून सुजित राजेंद्र सिंग रा. वसई जि. पालघर हा फरार होता दिनांक 11/9/2021 रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना माहिती मिळाली की, पाहिजे असलेला आरोपी सुजित राजेंद्र सिंग मिरारोड वसई येथे येणार आहे. खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी यांनी या ठिकाणी जावून सापळा लावून आरोपी यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सुजित राजेंद्र सिंग 44 हल्ली रा. मितालीहाईटसगोल्डन नेस्ट वसई विरार जि.ठाणे मुळ रा.कचवा जि. मिर्झापुर उत्तर प्रदेश असे सांगीतले.
कोणत्याही अनोळखी ठिकाणी -ढच् चा वापर करू नये तसेच अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले -ढच् कार्ड देवु नये तसेच आपल्या -ढच् कार्डचा पिन नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नये व -ढच् रूम मध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या मागे उभे राहण्यास मज्जाव करावा. असे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. ही कामगिरी मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन अ.नगर यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment