महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ- पुष्पा बोरुडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ- पुष्पा बोरुडे.

 महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ - पुष्पा बोरुडे.

महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.पुष्पा बोरुडे व उपसभापतीपदी मिना चोपडा बिनविरोध...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज सर्वांच्या सहकार्याने महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. या पदाच्या माध्यमातून महिलांचे व बालकांचे प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करु.  मनपाच्यावतीने शहरातील महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. महिला व बालकांच्या हक्कासाठी मनपा कटीबद्ध आहोत. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक महिलांचा आधार गेल्या आहे तर बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. अशा महिला व बालकांना मदतरुपी आधार देण्याच्या कामास आपले प्राधान्य असेल. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिला व बालकांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. यासाठी महापौर व सर्व नगरसेविकांचे आपणास सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन महिला व बाल कल्याण समितीच्या नूतन सभापती पुष्पा बोरुडे यांनी केले.
याप्रसंगी नूतन उपसभापती मिनाताई चोपडा म्हणाल्या, नगरसेविका  म्हणून प्रभागाचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. आता उप सभापतीपदी निवड झाली असून त्या माध्यमातून महिलांच्या अडअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाच्या माध्यमातून चांगले काम करुन न्याय देऊ, असे सांगितले. या निवडीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. उपनिवडणुक उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील तसेच नगरसचिव एस.बी.तडवी यांनी सहाय्य केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सभापती व उपसभापती यांचा सन्मान केला. तसेच महापौर रोहिणी शेंडगे यांनी नूतन सभापती पुष्पा बोरुडे व उपसभापती मिना चोपडा यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
मनपा महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.पुष्पा बोरुडे व उपसभापती पदी मिना चोपडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा  महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  माजी महापौर सुरेखा कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, प्रा.माणिक विधाते, संभाजी कदम, संजय चोपडा, संजय शेंडगे, सुवर्णा गेनप्पा, अनिल बोरुडे, शांता शिंदे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, गणेश कवडे, प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment