दरोड्याचे गुन्ह्यातील, फरार आरोपीस अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 8, 2021

दरोड्याचे गुन्ह्यातील, फरार आरोपीस अटक

 दरोड्याचे गुन्ह्यातील, फरार आरोपीस अटक

सोनई, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर- काल 07 सप्टेंबर रात्री आठ ते  आज दि. 08 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास  तोफखाना पोलीस स्टेशन हदिदत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलींग करीत असताना तपोवन रोड, दोस्ती हॉटेल जवळ, अहमदनगर येथे एक इसम तोंडाला रुमाल बांधून त्याचे अस्तित्व लपवून पोलीसांना पाहुन काटवनात पळुन गेला तोफखाना पोलीसांना संशय आल्याने त्यांनी त्या इसमाचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव गोरख अशोक माळी वय 25 वर्षे रा. माळी चिंचोरा, ता.नेवासा असे सांगितल्यावर सोनई,एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दरोड्याचे गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे पोलीसांना समजले.
तोफखाना पोलीसांनी गोरख माळीवर मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे तोफखाना पो.स्टे.ला. गुन्हा दाखल केला असुन तपासा दरम्यान आरोपीवर एम. आय.डि.सी. पो. स्टे.गु.र.नं.22/2018 भा.द.वि.क.395, 143, 147, 148, 149, 326,427 प्रमाणे दाखल गुन्हयात तसेच सोनई पो.स्टे. गु.र.नं. 148/2020 भा.द.वि.क. 3942) गु.र.नं. 18/2018 भा.द.वि.क.392, 341, 34 वैगेरे प्रमाणे दाखल गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीस स्टेशन हदिदत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलींग करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here