अ‍ॅपे रिक्षा चोरणारा गजाआड; रिक्षाही सापडली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

अ‍ॅपे रिक्षा चोरणारा गजाआड; रिक्षाही सापडली.

 अ‍ॅपे रिक्षा चोरणारा गजाआड; रिक्षाही सापडली.

कोतवाली पोलीसांची कारवाई...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मार्केटयार्ड समोरील कष्टाची भाकर केंद्र या ठिकाणी बुरुडगावरोड वरील निलेश शिंदे वय 35 रा. भोसले आखाडा लावलेली अ‍ॅपे रिक्षा चोरून नेणारा सुरज दिलीप नरवडे रा. तपोवन रोड या आरोपीस कोतवाली पोलिसांनी गजाआड केले असून चोरी गेलेली अ‍ॅपे रिक्षा राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे पोलिसांना बेवारस स्थितीत मिळून आली आहे.कोतवाली पोलीसांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये छडा लावून संबंधित रिक्षा हस्तगत करून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
मार्केटयार्ड परिसरामध्ये निलेश शिंदे वय 35 वर्षे रा गल्ली भोसले आखाडा बुरुडगाव रोड हे कष्टाची भाकरी केंद्रातील त्यांचे काम आटोपल्यावर त्याची पॅगो  रिक्षा क्र एम एच 16 वही 1994 कष्टाची भाकरी केंद्रा समोर मार्केटयार्ड येथे लॉक करुन हॉटेलमध्ये झोपायला गेले होते. शिंदे यांची  अपे रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिथे हन्डल लॉक तोडून चोरून नेली होती.सदर बाब शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाण्याचे संपर्क केला या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  राकेश मानगांवकर यांनी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही तपास करत होते तसेच या घटनेतील आरोपी याला नगर येथे आयुर्वेद कॉलेज च्या कॉर्नर जवळ  त्याला पकडले होते ज्या वेळेला त्याच्याकडे अधिक चौकशी केली होती त्या वेळात त्याने रिक्षा चोरल्याचे कबूल केले व सदरची रिक्षा ही आपण वांबोरी येथे सोडून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक राहुरी तालुक्यातील वांबोरी   येथे  गेले, सदरची रिक्षा हि बेवारस स्थितीत मिळून आली.सदरची कारवाई ही .पोलीस अधिक्षक मनोज पाटील, .अपर पोलीस अधिक्षक  सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी .विशाल दुमे  यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांकर, मनोज कचरे, नितीन गाडगे, शरद गायकवाड, शाहीद शेख,बंदु भागदत, भारत इंगळे, योगेश भिंगारदिवे, सुमित गवळी पोक अभय कदम, दिपक रोहोकले, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे, तान्हाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, यांनी केली आहे. या आरोपी विरुद्ध  विरुध्द बापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन नगर व इतर पोलीस स्टेशन येथे  प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment