ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला भावपूर्ण निरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 20, 2021

ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला भावपूर्ण निरोप

 ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला भावपूर्ण निरोप

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उत्थापन पुजा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या मानाच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व सौ.दिपाली भोसले यांच्या हस्ते उत्थापनाची महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज आदिंसह विश्वस्त उपस्थित होते. सायं 6 वा. मानाच्या गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत कोविड नियमांचे पालन करत विसर्जन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की, श्री गणेशोत्सव हा घरगुती व सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या उत्सवावर शासनाच्यावतीने बंधने आणली आहेत. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी हे बंधने आवश्यक आहेत.  शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत यंदाच्या गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळानी सहकार्य केले. नगर जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियम पाळण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी मंदिरास देणगी देणारे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, चंद्रक़ांत फुलारी, रंगनाथ फुलसौंदर, प्रकाश बोरुडे, भाऊसाहेब फुलसौंदर, शिवाजी शिंदे आदिंसह गणपती मंदिरातील सर्व सेवेकरी आदि उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण दहा दिवस मंदिर परिसरामध्ये बंदोबस्ताचे काम करणारे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी भावपुर्ण वातावरणात श्री गणेशाला निरोप दिला.

No comments:

Post a Comment