नागेबाबा सुरक्षा कवच योजनेचा 10 लाखाचा धनादेश लाभार्थीला सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 20, 2021

नागेबाबा सुरक्षा कवच योजनेचा 10 लाखाचा धनादेश लाभार्थीला सुपूर्द

 नागेबाबा सुरक्षा कवच योजनेचा 10 लाखाचा धनादेश लाभार्थीला सुपूर्द


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने सभासद व सर्वसामान्य नागरिकांसाठी नागेबाबा सुरक्षा कवच ही विमा योजना सुरु केली आहे. या योजनेचे लाभार्थी पोपट आठरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या वारसदार पत्नीस 10 लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे यांनी दिला. यावेळी तज्ञ संचालक सी.ए अमित फिरोदिया, फंड मॅनेजर अनिल कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कडूभाऊ काळे म्हणाले, नागेबाबा परिवार मधील सर्व सभासदांच्या सुख दु:खात समरस होत त्यांना आर्थिकदृष्ट्या, शैक्षणीक, वैचारिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षमकरण्यासाठी ही संस्था काम करत आहे. सध्याचा काळात अनेक संकटे येत आहेत. अनेक कुटुंब या संकटात उध्वस्थ झाली आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने नागेबाबा कवच योजना प्रभावीपणे राबवत आहोत. सर्व नागरिकांनी या सुरक्षा कवच्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
प्रास्ताविकात सी.ए.अमित फिरोदिया म्हणाले, नागेबाबा सुरक्षा कवच योजनेत केवळ 300 रुपयात 365 दिवस 10 लाख रुपयांचे अपघाती जोखीम व 5 लाख रुपयांचे हॉस्पिटल मधील उपचार नागरिकांना मिळणार आहे. आमच्या तिसगाव शाखेचे नागेबाबा सुरक्षा कवचाचे लाभार्थी पोपट आठरे या कुटुंबप्रमुखाचे अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नीस लगेच 10 लाखाचा धनादेश दिला आहे. नागेबाबा परिवार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत आहे. अत्यल्प दरात वर्षभर मिळणार्‍या विमा कवच योजना 31 डिसेंबरपर्यंतच मिळणार आहे.

No comments:

Post a Comment