पदाच्या माध्यमातून शहर विकासाला चालना द्यावी ः अ‍ॅड. आगरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 20, 2021

पदाच्या माध्यमातून शहर विकासाला चालना द्यावी ः अ‍ॅड. आगरकर

 पदाच्या माध्यमातून शहर विकासाला चालना द्यावी ः अ‍ॅड. आगरकर

श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सौ.बोरुडे व सौ. चोपडा यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद हे सर्व शहरवासीयांच्या पाठिशी आहेत. भाविकांच्या मनोकामना श्री विशाल गणपती पूर्ण करत असतो. मनपाच्या माध्यमातून शहराचा विकास व्हावा, यासाठी पदाधिकारी काम करत आहेत. आता निवड झालेले पदाधिकारी हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली असल्याने आता त्यांच्यावर सभापती व उपसभापती पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊन शहर विकासाला चालना द्यावी. या कार्यात श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद आपल्या पाठिशी राहतील, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.
महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.पुष्पा बोरुडे व उपसभापतीपदी सौ.मिना चोपडा यांची निवड झाल्याबद्दल श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पुष्पाताई बोरुडे म्हणाले, शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विाशल गणेशावर आमच्या परिवाराची मोठी श्रद्धा आहे. त्यांच्या आशिर्वादाने आपणास सामाजिक कार्यात काम करतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. सर्वांच्या सहकार्याने आपली सभापतीपदावर नियुक्ती झाली आहे, त्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ. तसेच शहरातील इतरही प्रश्न सोडविण्याचायाप्रसंगी मिना चोपडा म्हणाल्या, श्री विशाल गणेशाच्या आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याने कार्य करण्यास पाठबळ मिळत आहे. आताही मिळलेल्या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करुन शहर विकासात योगदान देऊ, असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक पंडितराव खरपुडे यांनी केले तर आभार अशोकराव कानडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment