कल्याण रोडवरील पुलाची महापौर शेंडगे यांनी पाहणी करुन साधला नागरिकांशी संवाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

कल्याण रोडवरील पुलाची महापौर शेंडगे यांनी पाहणी करुन साधला नागरिकांशी संवाद

 कल्याण रोडवरील पुलाची महापौर शेंडगे यांनी पाहणी करुन साधला नागरिकांशी संवाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कालपासून विविध भागात  झालेल्या पावसामुळे सीना नदीला पुर आला असून,  कल्याण रोडवरील पुल पाण्याखाली गेला असल्याने महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी या पुलाची व पुर परिस्थितीची पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक सचिन शिंदे, इंजि.मनोज पारखे, प्रभाग अधिकारी सिनारे, किशोर कानडे, संभाजी गुंजाळ, श्रेयश कुलकर्णी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सीना नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने तो पुल तात्पुरता बंद करण्यात आले असल्याने येथील भागाची पाहणी महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी  पुर परिस्थितीचा आढावा घेतला. नदी लगतच्या ज्या भागात पाणी शिरले आहे, त्या भागातील ज्या नागरिकांना हलविण्याची आवश्यकता आहे, अशा नागरिकांचे तत्पुरते स्थलातर करावे, तसेच ज्या भागात पाणी शिरले आहे, त्या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे नागरिकांशी संवाद साधतांना नागरिकांनी कोणताही धोका न पत्कारता पुलावर वाहतुक करु नये, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरही रस्त्यांसह इतर काही नुकसान झाले असल्यास तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. याबाबत मनपा आयुक्त, पोलिस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वीज कंपनी आदि अधिकार्यांना येथील पुर परिस्थितीची माहिती दिली असल्याने सांगितले. त्याचप्रमाणे नागरिकांनी घाबरुन न जाता काही अडचण असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले.

No comments:

Post a Comment