बोल्हेगावातील आरोग्य केंद्राला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

बोल्हेगावातील आरोग्य केंद्राला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दया

 बोल्हेगावातील आरोग्य केंद्राला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दया

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांची मनपा आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र.7 बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, शंभुराजे चौक ते जिल्हा परिषद शाळा पर्यतच्या या मुख्य रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करावे तसेच आंबेडकर चौक येथील मनपा आरोग्य केंद्राला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्र असे नामकरण करण्याबाबत नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे व महापौर रोहिणीताई शेंडगे यांना निवेदन देऊन महासभेत हा विषय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.
बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, शंभुराजे चौक ते जिल्हा परिषद शाळापर्यतचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व मुख्य रस्ता आहे. हा रस्ता अनेक उपनगरांना जोडला गेला आहे, याठिकाणी येणार्‍यांना कुठलेही ठिकाण उपजत नाही या रोडचे नामकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या मुख्य रस्त्याला आत्तापर्यंत कुठलेही नाव दिलेले नाही येणार्‍या महासभेत छत्रपति शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण बाबतचा विषय प्राधान्याने महासभेत घेण्यात यावा अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे आराध्य दैवत आहे.अशा या थोर महापुरुषाचे नाव या मार्गाला द्यावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहे.तसेच आंबेडकर चौक येथील आरोग्य केंद्राला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आरोग्य केंद्र असे नामकरण करण्यात यावे या ठिकाणी सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे.परंतु या आरोग्य केंद्राला कोणतेही नाव नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्र असे नामांतर करण्यात यावे अशी मागणीही या भागातील रहिवाशांनी माझ्या कडे केली आहे. तरी हा विषय आ.संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आयुक्त व महापौर यांना निवेदन देऊन महासभेकडे घेण्यात यावा अशी सूचना केल्या नंतर आज आयुक्त शंकर गोरे व महापौर रोहीणी शेंडगे यांच्याकडे केली नामकरणाची मागणी केली असून लवकरात-लवकर महासभा काढून हा विषय अजेंठयावर घेण्यात यावी अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी नगरसेवक राजेश कातोरे, रमेश वाकळे, सावळाराम कापडे,कारन वाकळे,गौतम कापडे, गणेश वाकळे, राम काते, धनंजय सरोदे, प्रशांत बेलेकर, चिऊ औटी, मुन्ना शेख, बीपीन काटे, ज्ञानदेव कापडे, बाळासाहेब वाकळे, दत्तात्रय वाकळे, उत्तम वाकळे, नवनाथ कोलते, महेश वाकळे, राहुल कराळे, विष्णू कोलते, रावसाहेब वाटमोडे, भीमा वाकळे, सुरेश वाटमोडे, बाबा घोगरे, सुनील भालेराव, निवृत्ती उंडे, जीवन पगार,लातीब बेग, राजेंद्र मुंगसे, रमेश मुगसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment