नागरी सुविधा द्या अथवा घरपट्टी माफ करावे - बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

नागरी सुविधा द्या अथवा घरपट्टी माफ करावे - बोज्जा

 नागरी सुविधा द्या अथवा घरपट्टी माफ करावे - बोज्जा

प्रशासन बेजबाबदार की लोक प्रतिनिधी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील खड्डयाचे प्रमाण इतके वाढले की प्रशासन नागरी सुविधा देण्यास अकार्यक्षम झाले असल्याने एक तर नागरी सुविधा द्या किंवा घरपट्टी माफ करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. आयुक्त साहेब, मनपा यांच्याकडे केली आहे.
सध्या अहमदनगर शहरातील रस्त्यांची परिस्तिथी अतिशय गंभीर व भयानक झाली असून रस्त्यावर इतके खड्डे झालेत की काही ठिकाणी रस्ते आहेत की खड्डे हेच कळत नसून खड्डयामधून रस्ता शोधावा लागत आहे. नागरिकांचे जाण्या येण्यास अत्यंत हाल होत आहेत परंतु या बाबत नागरिक, प्रशासन वा लोकप्रतिनिधी कोणीही भ्रशब्द काढायला तयार नाहीत ही गंभीर परिस्तिथी नगर मध्ये निर्माण झाली आहे.
साणासुधीत रस्त्याचे डागडुजी का थांबवली
पूर्वी गणपती व मोहरम सण आले की रस्त्यांची डागडुजी व्हायची व त्यामुळे का होईना रस्ते काही दिवस खड्डे विरहित होत होते परंतु या वेळी मोहरम, गणेश उत्सव येऊन ही रस्त्यातील खड्डे जशाचे तसे आहेत. याबाबत प्रशासन बेजबाबदार वागतेय की लोकप्रतिनिधी हे कळायलाच तयार नाही. नक्कीच कोरोना प्रादुर्भावमुळे प्रशासनास निधी मिळत नसेल परंतु महानगरपालिकेने नागरिकांकडून घरपट्टी वसूल करणे थांबवलेले नाही मग त्या पैशातून का होईना ही खड्डे जर बुजविले तर बरे होईल. यासाठी प्रशासनाने नागरिकांना नागरी सुविधा द्या किंवा आर्थिक संकट दूर करून घरपट्टी तरी माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व मा.आयुक्त यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment