आरोग्य सेविकांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थपना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

आरोग्य सेविकांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थपना

 आरोग्य सेविकांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थपना.

चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टचा अनोखा उपक्रम.नगरी दवंडी/प्रिंतनिधी


अहमदनगर ः
स्थापनेचे 75 वे वर्ष साजरे करणारे चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टच्या अमृतमहोत्सवी गणेशोत्सवास मोठ्या उत्साहात पण सध्या पद्धतीने सुरवात झाली. कोरोना काळात मनपाच्या लसीकरण केंद्रावर सेवा देणार्‍या महात्मा फुले आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांच्या हस्ते निर्विघ्न गणेशाची प्रतिष्ठापना करून अनोखा उपक्रम राबवला. चौपाटी कारंजा चौकातील श्रीदत्त मंदिरात वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी गाढे, सुपरवायझर अश्विनी जोशी, परिचारिका राजश्री धोंगडे, जयमाला शिंदे, अर्चना उमाप यांनी विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिस्थापणा केली. मंडळाच्या वतीने चारही आरोग्य सेविकिंचा फेटे बांधून व भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.

कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग व शाडूमाती पासून बनवलेल्या निर्विघ्न गणेशमूर्तीची प्रतिस्थापना केली. मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाचे व सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. अमोल भंडारे म्हणाले, करोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी सध्या पद्धतीने व नियमांचे पालन करत गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहोत. मंडळाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेच्या काळात आरोग्य सेविकांनी खंबीरपणे उभे राहून घरातील व आरोग्यकेंद्रातील सर्व जवाबदार्‍या योग्य पध्दतीने पार पडल्या आहेत. त्यांचे कार्य पाहिल्यावर नर्सला सिस्टर का म्हणतात समजते. म्हणूनच त्यंच्या हस्ते गणेशाची स्थापना करून ह्या भगिनींच्या कार्याचा गौरव केला आहे. यावेळी चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्टचे महेंद्र ताकपिरे, महेश कुलकर्णी, सागर रोहोकले, विवेक भिडे, नाना भागानागरे, राहुल वरखेडकर, पुरुषोत्तम बुरसे, अरविंद मूनगेल, अक्रम पठाण, मयूर कुलकर्णी, श्रीपाद वाघमारे, तेजस वैद्य, अनिकेत पाटोळे, राजू बिडकर, प्रसन्न बिडकर, सूचित भळगट, मयूर जोशी, माणिक आव्हाड, शुभम वैराळ, भरत  दरेकर व निल गांधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here