नीलफलकाचा उपक्रम नव्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरेल- आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

नीलफलकाचा उपक्रम नव्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरेल- आ.संग्राम जगताप

 नीलफलकाचा उपक्रम नव्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरेल- आ.संग्राम जगताप

रसिक ग्रुपच्या वतीने लावलेल्या चार नीलफलकांचे अनावरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी आमदार स्व.डॉ.श्रीकृष्ण निसळ यांनी त्याकाळात शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेले योगदान बहुमोल आहे. तसेच नगर मधील स्वतंत्र सैनिक स्व.जानकी कवडे, स्व.बी.यू.खान, स्व.एकनाथराव शिंदे यांनीही देश व शहरासाठी दिलेले समर्पण नगरकर कदापि विसरणार नाहीत. या सर्वांनी शहराच्या वैभवात भर घालताना आपल्या कर्तुत्वाने शहराचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त करत रसिक ग्रुपने त्यांच्या निवास स्थानावर निलफलक लावून सर्वांच्या कार्याचा उचित सन्मानच केला आहे. नीलफलकाचा उपक्रम शहरातील नव्या पिढीला कायम प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सांस्कृतिक चळवळीत काम करणार्‍या रसिक ग्रूपच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी आमदार स्व.डॉ.श्रीकृष्ण निसळ, स्वातंत्र सैनिक स्व.जानकी कवडे, स्व.बी.यू.खान व स्व.एकनाथराव शिंदे यांनी शहरात वास्त्यव्य केलेल्या निवास्थानावर खास नीलफलक लावले आहेत. या सर्व निलफलकांचे अनावरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात झाले. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक अनिल सहस्त्रबुध्दे, नगरसेविका सोनाली चितळे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, अभिनेते मोहनीराज गटणे, श्रीनिवास बोज्जा, ज्ञानदेव पांडूळे, अजय चितळे, संजय झिंजे आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते. यावेळी रसिक ग्रुपच्या वतीने प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी सनई चौघड्यांच्या सुरात व दारात सुंदर रांगो रेखाटून सर्वांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
आ. जगताप पुढे म्हणाले, स्व.श्रीकृष्ण निसळ यांनी आमदार असताना शहर वासियांची गरज ओळखून पाण्याची योजना मंजूर करून महत्वाचे कामे केले होते. या कामाची प्रेरणा घेत मी पण शहरासाठी मुळा धरणा पासून आणखी एक नव्या पाईपलाईनचे काम केले असून 90 टक्के काम झाले आहे. नगर शहराचा कायापालट करण्यासाठी अनेक मोठे विकास कामे प्रगतीपथावर आहेत.
अविनाश घुले म्हणाले, शहराच्या सांस्कृतिक, पर्यटन विकासाच्या चळवळीत मोलाचे योगदान देणार्‍या रसिक ग्रुपचा निल फलक उपक्रम कौतुकास्पद आहे. या ग्रुपला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करू.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, एखाद्या शहरात समाजासाठी आपले योगदान देणार्‍या व्यक्तींविषयी नवीन पिढी जर सन्मानाने प्रेम व आदरभाव व्यक्त करीत असतील तर ही गोष्ट शहराच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.
किशोर डागवाले म्हणाले, आज निलफलक लावलेले चारही व्यक्तिमत्वे आनंदी बाजार परिसरात वास्तव्यास होते. माझ्या प्रभागात असे आदर्शवत काम करणारे व्यक्ती होवून गेल्याचा मला अभिमान आहे.
जयंत येलुलकर म्हणाले, आपल्या शहरामध्ये विवीध क्षेत्रात ज्यांनी योगदान देत आदर्श निर्माण केला, ती व्यक्तिमत्व केवळ त्यांच्याच कुटुंबातील नव्हे तर सर्व नगरकरांच्या कुटुंबाचा भाग आहेत. रसिक ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आदर्श काम करणार्‍या व्यक्तींप्रती आदर व्यक्त करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने अशा आदर्शवत व्यक्तीचा नीलफलक लावून सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी नगरसेविका सोनाली चितळे, श्रीनिवास बोज्जा, स्वातंत्र्य सैनिक डेंगळे, देवेंद्र कवडे, रवींद्र कवडे यांची भाषणे झाली. यावेळी कवडे, डॉ.निसळ, खान व शिंदे कुटुंबीयांच्या वतीने प्रतिभा वाळके, डॉ.शैलजा निसळ, गिरीश निसळ, अन्वर खान व रऊफ शेख, डॉ.जयवंत शिंदे, यशवंत शिंदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. रसिक ग्रुपचे हनिफ शेख, बाळकृष्ण गोटीपामुल, श्रीकृष्ण बारटक्के, राजेंद्र सांगळे, शिववरद प्रतिष्ठाणच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबासाहेब वैद्य, सुहास पाथरकर आदींनी पाहुण्यांचा सत्कार केला. स्वागत शारदा होशिंग यांनी केले तर आभार महेंद्र कवडे यांनी मानले. निलफलका साठी नंदराज केटरर्सचे संचालक राजेंद्र उदागे यांचे तसेच शिववरद ज्येष्ठ नागरिक संघाचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी गजेंद्र कवडे, अभिनंदन वाळके, सागर गोरे, मुकूंद वाळके, अ‍ॅड.गौरव मिरीकर, अ‍ॅड.सुनिल सूर्यवंशी, अनिल शिंदे, रोहन डागवाले, नितीन डागवाले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment