भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी किरण कोकाटे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी किरण कोकाटे यांची निवड

 भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी किरण कोकाटे यांची निवड

जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन केले जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर येथे शासकीय विश्रामगृहावर भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक पार पडली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुणजी मुंडे जिल्हा सरचिटणीस दिलीप भाई सिंग जिल्हा बुथ संयोजक मनोज कुलकर्णी पारनेर बूथ प्रभारी सुभाष गायकवाड पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष वसंत चेडे पारनेर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सुजित झावरे यांनी बुथ रचनेचा आढावा घेतला बुथ रचना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन या संबंधी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये किरण बाळासाहेब कोकाटे यांची पारनेर शहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली या बैठकीसाठी सुनील थोरात, सुभाष दुधाडे,बाळासाहेब नरसाळे, कृष्णाजी बडवे बाबासाहेब हरिभाऊ चेडे ,पोपटराव मोरे तुषार पवार, सागर मेड, रामदास नवले ,गंगाधर सालके, सचिन ठुबे, मनोहर राऊत, सुनील उमाप दिपक भागवत, आनंद गांधी  व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी सुजीत झावरे पाटील यांची पारनेर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
 सुजीत झावरे पाटील यांचा मतदार संघाचे प्रमुख झाल्या मुळे सत्कार करण्यात आला सागर मेड यांनी उपस्थितांचे आभार मानले बैठक संपन्न झाली.

No comments:

Post a Comment