अहमदनगर मनपाच्या पिंपळगाव माळवी तलावातील, पाण्याचे महापौरांच्या शुभहस्ते जलपुजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

अहमदनगर मनपाच्या पिंपळगाव माळवी तलावातील, पाण्याचे महापौरांच्या शुभहस्ते जलपुजन.

 अहमदनगर मनपाच्या पिंपळगाव माळवी तलावातील, पाण्याचे महापौरांच्या शुभहस्ते जलपुजन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  अहमदनगर महानगरपालिकेच्या पिंपळगांव माळवी तलाव पावसाच्या पाण्याने भरलेला असून नगर शहरापासून अगदी जवळच हा परिसर आहे. निसर्ग संपन्न वातावरण यामुळे या परिसरात नागरिक सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात. नयनरम्य अशा महानगरपालिकेच्या मालकीची 700 एकर जागा असलेल्या पिंपळगांव माळवी तलाव येथील पाण्याचे जलपुजन महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महापौर शेंडगे म्हणाल्या की नागरिकांना तलाव परिसरात बसण्यासाठी चांगले बाकडे बसविण्यात येतील.  काही ठिकाणी विद्युत व्यवस्था देखील करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे. तलाव भरल्यानंतर सांडेवरून वाहणारे पाणी दगडी फरशीवर वाहून खाली जाते जास्त पाऊस झाल्यावर रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात; त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिलींग बसविण्यात येईल. नगर शहराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांना मनोरंजनासाठी मनपाच्या उत्पन्नाच्या दृष्टिने बोटींग सुरू करणार. त्यासाठी वेगवेगळया एजन्सी नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. तलावाच्या चारही बाजूने लोखंडी माहिती फलक बोर्ड बसविणे बाबत सांगितले. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना तलाव परिसराची माहिती मिळेल असेही त्या म्हणाल्या.
 यावेळी सरपंच सौ.राधिका प्रभुणे यांनी सांगितले की, त्या ठिकाणी असलेला वॉल ला गळती असून त्यामुळे पाणी वाया जाते. तलाव परिसरातील आजू बाजूला असलेली  झाडे झुडपे काढणे बाबत सांगितले. याबाबत महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी जलअभियंता यांना वॉल दुरूस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम,  माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे , संतोष गेणाप्पा, पिंपळगांव माळवीचे सरपंच सौ. राधिका प्रभुणे, उपसरपंच सौ.भारती बनकर, उदयोजक सुभाष झिने, सोसायटीचे चेअरमन शशिकांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सतिष बनकर, संजय प्रभुणे, किशोर कानडे, श्रेयश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment