शिवशंभु जिजाऊ सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बाजीराव काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

शिवशंभु जिजाऊ सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बाजीराव काळे

 शिवशंभु जिजाऊ सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बाजीराव काळे

अध्यक्ष योगेशभाऊ ओव्हाळ पाटील काळे  यांनी दिले नियुक्तीचे पत्र


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील बाजीराव कमळाकर काळे यांची शिवशंभु जिजाऊ सेना या सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष योगेशभाऊ ओव्हाळ पाटील यांनी काळे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
     शिवशंभु जिजाऊ सेना या सामाजिक संघटनेत समाजातील विविध घटकातील नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे प्रयत्न पुढील काळात करणार असल्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष बाजीराव काळे यांनी सांगितले.
      काळे यांच्या या निवडीबद्दल अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भोयरे गांगर्डा गावचे सरपंच अनिता भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच सुधीर पवार, माजी सरपंच भामाबाई भैय्यासाहेब रसाळ, भाऊसाहेब चांगदेव भोगाडे, माजी उपसरपंच दौलत गांगड, संजय पवार, माजी उपसरपंच तथा पत्रकार शरद रसाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिक पवार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, संचालक आप्पासाहेब रसाळ, ग्रामपंचायत सदस्य किशोर रसाळ, शिवाजी भोगाडे, आदिनाथ गायकवाड, संतोष केकडे आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment