उच्च न्यायालयाची स्थगिती असतांना देखील दिव्यांगाचा छळ करण्याचे षडयंत्र ः अ‍ॅड. पोकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

उच्च न्यायालयाची स्थगिती असतांना देखील दिव्यांगाचा छळ करण्याचे षडयंत्र ः अ‍ॅड. पोकळे

 उच्च न्यायालयाची स्थगिती असतांना देखील दिव्यांगाचा छळ करण्याचे षडयंत्र ः अ‍ॅड. पोकळे

जिल्हा रुग्णालयातील प्रकार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सन 2004 पासून दिव्यांग संदिप खामकरशासनाच्या सर्व परवान्यासह श्री साईनाथ कम्युनिकेशन अ‍ॅण्ड झेरॉक्स या नावाने व्यवसाय करत आहेत.  सदर जागेचे वार्षिक भाडे भाडेकरारानुसार अदा करत असूनही जिल्हा रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकरणाचा पत्र व्यवहार न करता फक्त तोंडी सूचना देऊन सदरील दुकान बंद करण्यास सांगण्यात येत आहे, हा प्रक़ार म्हणजे दिव्यांगाचा छळ करण्याचा प्रक़ार असल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे नगर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे यांनी केला आहे.
संदिप खामकर यांची व कुटुंबियांची उपजिविका या माध्यमातून होत असून शासकीय स्तरावरुन दिव्यांग बांधवांचे जीवन सुकर होण्यासाठी अनेक कायदे बनवले जातात, पण प्रत्यक्ष अंमलबजावीच्या वेळेस दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण करण्याऐवजी गदा आणण्याचे काम अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय आस्थापनेकडून होत आहे. याचा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनच्यवतीने निषेध करण्यात येत आहे. सदरील प्रकरणाची आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येईल. सदरील दिव्यांगास न्याय मिळेपर्यंत संविधानिक मार्गाचा अवलंब करुन तीव्र लढा देण्यात येईल, असेही पत्रकाद्वारे अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment