श्रीराम हार्डवेअरमुळे शेतकर्‍यांचा पैसा व वेळ वाचणार : गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

श्रीराम हार्डवेअरमुळे शेतकर्‍यांचा पैसा व वेळ वाचणार : गायकवाड

 श्रीराम हार्डवेअरमुळे शेतकर्‍यांचा पैसा व वेळ वाचणार : गायकवाड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना शेती अवजारे, बिंल्डीग मटरेल, आदी वस्तु  गावातच उपलब्ध होणार आहे. हे साहित्य घेण्यासाठी याआधी नगर शहरात जावे लागत होते. आता दहिगाव येथे ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आसपासच्या गावातील शेतकर्‍यांचा वेळ व आथिर्क फायदा होणार असल्याचे लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सबाजीराव गायकवाड यांनी केले.
दहिगाव (ता. नगर ) येथे श्रीराम हार्डवेअर या नवीन दालनाचे उदघाट्न गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी  माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी उपसभापती रविंद्र भापकर, मार्केट कमिटीचे सभापती अभिलाष घिंगे, उपसभापती संतोष म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष  दादासाहेब दरेकर, पंचायत समिती माजी सदस्य संभाजी कासार, सरपंच शरद बोठे, महावीर नारळे, कुंकडीचे संचालक नितिन आण्णा डुबल, रमेश ठोंबरे, बाळासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, सचिन जाधव, भाऊसाहेब सुपेकर, रावसाहेब जाधव, सरपंच मधुकर म्हस्के, उपसंरपच  महेश म्हस्के श्रीराम  ट्रस्टचे अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के, मुन्नीर शेख, सोसायटीचे चेअरमन महादेव म्हस्के, दत्तात्रय बनकर, वाल्मिकी नागवडे, पत्रकार अविनाश निमसे, शिवा म्हस्के, शरीफ सय्यद,  रविंद्र काळभोर, रविंद्र अमृते, माजी सभापती राम साबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment