श्रीराम देवस्थान नावारूपाला येणार : हराळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

श्रीराम देवस्थान नावारूपाला येणार : हराळ

 श्रीराम देवस्थान नावारूपाला येणार : हराळ

माजी उपसभापती भापकर यांच्या निधीतून श्रीराम देवस्थानसाठी 5 लक्ष रुपये


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येणार्‍या काळात श्रीराम मंदिर देवस्थान व मंगल कार्यालय  मोठ्या नावारुपाला येणार असून  देवस्थान तिर्थक्षेत्र ’बं मध्ये नक्की आणले जाईल असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी   दिले. माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दहिगाव ( ता. नगर ) येथील श्रीराम देवस्थानला शौचालय व आरोग्य विषयक कामासाठी 5 लाख रुपये देण्यात आले. या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला यावेळी ते बोलत होते.
श्रीराम देवस्थान नगर-सोलापूर रोडवर असल्याने या ठिकाणी अनेक पायी दिंडीतील वारकरी  मुक्कामी थांबत असतात. तसेच  मोठ्या प्रमाणावर भावीक भक्तही दर्शना साठी थांबत असतात याठिकाणी शौचालय असणे अत्यंत गरजेचे होते. तशी दहिगाव ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती ती आज पुर्णत्वास आली आहे.
याप्रसंगी माजी उपसभापती रविंद्र भापकर,   सरपंच मधुकर म्हस्के, उपसंरपच महेश म्हस्के, सेवा सोयाटीचे महादेव म्हस्के, श्रीराम ट्रस्टचे अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के, विश्वस्त नाना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, पांडुरंग पोटरे,  लक्ष्मण ढेरे, सुलेमान सय्यद, दत्तात्रय बनकर, आन्हाड महराज, पोपट पोटरे, राम साबळे, विजय आन्हाड, ट्रस्टचे उपअध्यक्ष   सुनील म्हस्के, डॉ. सर्जेराव म्हस्के,  प्रकाश वाघमोडे, ग्रा.  स. बाळासाहेब हंबडेॅ, सुभाष गांधी, शरीफ सय्यद आदी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here