‘महावीर ई बाईक्स’मध्ये ‘प्युअर’च्या ई दुचाकी उपलब्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

‘महावीर ई बाईक्स’मध्ये ‘प्युअर’च्या ई दुचाकी उपलब्ध

 ‘महावीर ई बाईक्स’मध्ये ‘प्युअर’च्या ई दुचाकी उपलब्ध


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रदूषण टाळणारी व चार्जिंगच्या कमी खर्चात अधिक मायलेज देणारी ई दुचाकी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नगरमध्ये महावीर ई बाईक्सने अशा ई दुचाकींची रेंज उपलब्ध करून दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त नव्या युगातील ई दुचाकी खरेदी करून ग्राहक पर्यावरण संवर्धनाचा श्रीगणेशा करु शकतील, असा विश्वास महावीर ई बाईक्सचे संचालक ऋषभ दुगड यांनी व्यक्त केला. आनंदधाम परिसरातील महात्मा फुले चौकात महावीर ई बाईक्स येथे हैदराबाद येथील नामांकित प्युअर ईव्ही या कंपनीच्या ई स्कूटर, बॅटरीवरील सायकल उपलब्ध आहेत. प्युअर ईव्ही कंपनीची नगर जिल्ह्याची एकमेव डिलरशिप महावीर ई बाईक्सकडे आहे. ई प्लुटो, ई प्लुटो 7 जी, एंट्रस प्लस, मोपेड ही चार मॉडेल हटके लूक असणारी आहे. रेग्युलर तसेच बॅटरीवर चालणारी इट्रॉन प्लस सायकलही दालनात आहे. सर्व दुचाकींसाठी लिथियम बॅटरीचा वापर केलेला आहे. चार तास बॅटरी चार्जिंग केल्यावर सुमारे 70 ते 120 किलोमीटर दुचाकी चालू शकते. या वाहनांसाठी फायनान्स सुविधाही उपलब्ध आहे. ई दुचाकीच्या अधिक माहिती व टेस्ट ड्राईव्हसाठी संपर्क 8483005969.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here