वडिलांच्या नियुक्तीचे जुने कागदपत्र महापालिकेकडून गहाळ... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

वडिलांच्या नियुक्तीचे जुने कागदपत्र महापालिकेकडून गहाळ...

 विशेष बाब म्हणून वारस हक्काने नोकरी द्या.

वडिलांच्या नियुक्तीचे जुने कागदपत्र महापालिकेकडून गहाळ...

काते परिवाराचे आयुक्त व महापौरांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका होण्यापुर्वी नगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या वडिलांच्या नियुक्तीचे जुने कागदपत्र महापालिकेकडून गहाळ झाले असताना, विशेष बाब म्हणून वारस हक्काने शंकर काते यांना आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्याची मागणी साहेबराव काते यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे केली आहे.
काते यांनी वडिलांच्या नियुक्तीचे कागदपत्रे मिळण्यासाठी महापालिकेकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती. ही माहिती न मिळाल्याने नाशिक येथे राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल करण्यात आले. यावर महापालिकेला पत्र प्राप्त झाल्यानंतर उपायुक्तांनी सदर कागदपत्रासंबंधी आस्थापना प्रमुखाला काते परिवारा समक्ष बोलावून विचारपूस केली. यावर आस्थापना प्रमुखांनी जुने महापालिकेला सन 2012-13 मध्ये आग लागल्याने जुने रेकॉर्ड जळाल्याचे तोंडी सांगितले. यामुळे वारस हक्काने नोकरी मिळण्यासाठी जुने कागदपत्रे सापडत नसल्याने काते परिवाराच्या वारसाला नोकरी मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना, मुलगा शंकर काते यास विशेष बाब म्हणून महापालिकेत सफाई कामगार आरोग्य विभागामध्ये नोकरी देण्याची मागणी साहेबराव काते यांनी केली आहे. अन्यथा मुंबई येथे आझाद मैदानावर कुटुंबीयांसह उपोषण करुन, नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  
शंकर काते अहमदनगर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना कायमस्वरूपी कामाची नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सिताराम वाघमारे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांचे वारस दाखवून वडिलांच्या नावाने नोकरी मिळवली असल्याचा आरोप साहेबराव काते यांनी केला आहे. आई-वडिलांना धमकावून सदर कागदपत्रे नगरपालिकेत दाखल केले. मी व माझे भाऊ लहान व अशिक्षित असल्याने काही करता आले नसल्याचे काते यांनी निवेदनात म्हटले आहे.
सदर व्यक्ती पस्तीस ते चाळीस वर्षापासून नोकरी करत होता. त्यानंतर त्या जागेवर त्याच्या मुलाला नोकरी लावण्यात आली आहे. मात्र शंकर काते यांचे कुटुंबीय हक्काच्या नोकरीपासून वंचित असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सदर प्रकरणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या स्थापना प्रमुखांना शंकर काते यांचे नोकरीची जुनी ऑर्डर व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकारी सदर कागदपत्रे न्यायालयात सादर करू असे आश्वासन काते परिवाराला दिले होते. मात्र महापालिकेने ही कागदपत्रे उपलब्ध करत नसल्याने काते परिवाराने महापालिकेत आंदोलन करुन सदर कागदपत्रे मिळण्याची मागणी देखील केली होती.आता तरी आयुक्त व महापौरांनी आम्हास न्याय द्यावा अशी काते कुटुंबियांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment