अवैद्य गावठी हातभट्टी, दारू अड्डे उध्वस्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 13, 2021

अवैद्य गावठी हातभट्टी, दारू अड्डे उध्वस्त.

 डीवायएसपी संदीप मिटकेंच्या पथकाकडून, अवैद्य गावठी हातभट्टी, दारू अड्डे उध्वस्त.


श्रीरामपूर -
श्रीरामपूर तालुक्यातील अवैद्य गावठी हातभट्टी दारूचा नायनाट करण्याचा विडाच डीवायएसपी संदीप मिटके यांनी उचलला असून तालुक्यातील  खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले आहेत. मिटके यांचे पथकाने  या कारवाईत एक लाख दोन हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
अधिकमाहिती अशी कि 12 सप्टेंबर रोजी  पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  खैरी निमगाव परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्याचे आदेश दिले. या कारवाईत पोलिसांनी  मेश धोंडीराम गायकवाड (वय 35 रा. खैरी निमगाव), अर्जुन केशव गायकवाड या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याजवळून  एक लाख दोन हजार किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल  जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे  खैरी निमगाव येथील महिलांनी  ऊू.ी.ि. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.
ही कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली  ऊू.ी.ि  संदीप मिटके, -डख.राजेंद्र आरोळे,क.ल. सुरेश  औटी,  पो. कॉ. नितीन शिरसाठ चा. पो. कॉ.  रवींद्र लगड, आर सी पी पथक आदींनी केली.

No comments:

Post a Comment