मंगळसूत्र, चैन चोरी, डोळ्यात मिरची टाकून 10 लाखांची लूट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 13, 2021

मंगळसूत्र, चैन चोरी, डोळ्यात मिरची टाकून 10 लाखांची लूट.

 मंगळसूत्र, चैन चोरी, डोळ्यात मिरची टाकून 10 लाखांची लूट.

तोफखाना पोलीस ठाणाहद्दीत..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील भिस्तबाग येथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी घरासमोरून एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र तर सावेडी परिसरात राहत्या घराजवळून एका पुरुषांचे गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन जोराने हिसका देऊन गळ्यातून तोडून चोरट्यांनी धूमस्टाईलने चोरुन नेल्याच्या दोन घटना तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी घडल्या.  दोन्ही घटनेत चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून, दोन्हीही घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश वाईन्सचे व्यवस्थापक यांच्या डोळयात मिरची पावडर टाकून दुकानातील  10 लाख 70 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना रविवार (दि.12) रात्री घडली. तिसरी घटना घडली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराच कंपाउंडचे गेट उगडत असताना एक अनोळखी इसम हेल्मेट घातलेला काळ्या रंगाच्या मोपेड गाडीवर स्वार असलेला, काळे जकिंग घातलेला व शरीराने जाड असलेला अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसमाने गोकुळनगर येथील  घराजवळ उभी असताना  गळ्यातील 50 हजार  रु. कि.चे दोन तोळे वजनाचा, सोन्याच्या चैनीचा तुकडा चार तोळे वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्रामधील तुटलेला  हा जबरीने ओढून गळ्याला दुखापत करुन चोरुन घेऊन गेला.  तर  स्वप्नील रामचंद्र पवार (वय 30,  स्वॉफ्टवेअर अभियंता, रा. प्लॉट क्रमांक 48 श्रीकृष्ण रोड, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हे श्रीकृष्ण नगर येथील त्यांचे घरासमोर चालत असताना सदर अज्ञात आरोपी  याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन किंमत अंदाजे 70 हजार  रु. किमतीची ही जबरीने चोरुन ओढून पळून गेला आहे. असा एकूण 1 लाख 20 हजार  कि.चा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला, या लक्ष्मी नरसय्या गाडी(गजराज फॅक्टरी चिन्मय कॉलनी भिस्तबाग अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात394,392 या कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखान्याच्या प्रभारी पोनि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउनि. एस.पी.सोळंके हे करीत आहेत.
तिसर्‍या घटनेची हकीकत अशी, रविवार (दि.12) राञी 10 ते 10.15 वाजण्याच्या सुमारास काळया रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या  दोन अज्ञात चोरटे  प्रकाश वाइन्स दुकानात आले. त्या चोरट्यांनी चेह-यावर व डोळयात मिरची पावडर टाकून दुकानातील काळया 10 लाख 70 रुपये रक्कम  असणारी काळ्या रंगाची हेण्ड बॅग चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेली, या प्रकाश वाईन्स दुकानाचे   व्यवस्थापक आशोर शोर शेख (रा.अशोक गंगाराम बाले पंचवटीनगर भिस्तबाग, सावेडी अहमदनगर मूळ रा. नान्नज ता. जामखेड जि.अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखान्याच्या प्रभारी पोनि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पिंगळे या करीत आहेत.

No comments:

Post a Comment