उद्या राज्यात एक हजार ठिकाणी निदर्शने ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

उद्या राज्यात एक हजार ठिकाणी निदर्शने !

 उद्या राज्यात एक हजार ठिकाणी निदर्शने !

राज्यातील मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा.
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक


नागपूर -
ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. छगन भुजबळ मेळावे घेत राहिले मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र लक्ष दिले नाही, 28 जुलै ते आजपर्यंत एकही बैठक झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठित खंजीर खुपसला असून सर्व पक्षांची मदत असतानाही महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं असा आरोप करत भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात भाजपा एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, तसंच राज्यातील मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. सहा महिन्यात राज्य सरकारने काय केलं? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं. पण राज्य सरकारने काहीही केलं नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसंच पाचही जिल्हा परिषदमध्ये भाजप ओबीसी उमेदवार देणार असल्याचं बाववकुळे यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment