पंढरपुरातील संत नामदेव महाराजांच्या पायरीवर चप्पल बूट घालून हौदोस.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

पंढरपुरातील संत नामदेव महाराजांच्या पायरीवर चप्पल बूट घालून हौदोस..

 पंढरपुरातील संत नामदेव महाराजांच्या पायरीवर चप्पल बूट घालून हौदोस..

शिंपी समाजाकडून निषेध; कारवाईची मागणी.

ही विकृती अत्यंत संतापजनक, दुःखदायक, निंदनीय - श्रीकांत मांढरे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो.पण याच पवित्र भूमीत नुकतंच भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याच्या नावाखाली पंढरपूर येथील विट्ठल मंदिराचे प्रवेशद्वार येथे असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पायरीवर ( जी नामदेव पायरी) म्हणून ओळखली जाते व जिचे एक अनन्यसाधारण महत्त्व व पावित्र्य आहे. त्या ठिकाणी चप्पल व बूट घालून हैदोस घातला.तेव्हा हि विकृती अत्यंत संतापजनक, दुःखदायक व निंदनीय असून यामुळे संत नामदेव महाराज ज्या शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहे. त्या समाजाने व वारकरी समाजाने या विकृतीचा जाहीर निषेध केला असून ताबडतोब याप्रकरणी भाजपाने माफी मागावी. व या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा अहमदनगर जिल्ह्यात शिंपी समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी दिला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना मांढरे म्हणाले की, खरतर संत नामदेव महाराज यांचे यंदाचे वर्ष 751 वे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जात असतानाच मंदिर उघडण्याच्या नावाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेली ही विकृती कितपत योग्य आहे ? देवळात गेल्यावर आपण न चुकता पादत्राणे बाहेर काढतो,मग ती अक्कल एखाद्या पवित्र ठिकाणी गेल्यावर आपल्याकडे का नको ? एकीकडे विरोधी पक्षनेते मा देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत नामदेव महाराजांचे नाव हे आघाडी सरकारने महापुरुषांच्या यादीत समाविष्ट केले नाही व ते समाविष्ट व्हावे म्हणून आवाज उठवितात तर दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते त्याच नामदेव महाराजांच्या पायरीची विटंबना करतात. किती हा विरोधाभास.व यातून नेमका कोणता संदेश भाजपा देऊ इच्छिते.तेव्हा झालेला हा प्रकार खरच खूप वाईट असून ज्या महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणून ओळखतो व अनेकवेळा संतांचे दाखले व गोडवे गातो,तेथील जनता अशा राजकारणी व त्यांच्या कार्यकर्त्यांना कदापि माफ करणार नाही.असे प्रकार जर कोणत्याही राजकीय पक्षाकडून घडत असतील तर ते योग्य नसून नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यायला हवी व नेत्यांनीही याचे चिंतन करायला हवे असेही ते म्हणाले.
भिंगार शिंपी समाजाचे अध्यक्ष,व नामदेव समाजोन्नती परिषद चे नगर जिल्हाउपाध्यक्ष मा.श्री.शैलेश धोकटे,पदाधिकारी,मा.श्री.सतिश वाधवणे,श्री.ज्ञानेश्वर कविटकर, श्री.दिलीप गिते,श्री.शरद गिते,श्री.सुरेश चुटके,श्री.दिलीप काकडे,श्री.संतोष माळवदे,श्री.कैलास गुजर,श्री.दिपक देठ,श्री.दिपक बकरे यांनीही या प्रकरणाचा निषेध करून कारवाईची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment