गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नेवासा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नेवासा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.

 गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नेवासा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.


नेवासा -
पंचायत समिती कार्यालय नेवासा येथील सभागृहामध्ये येणार्‍या गणेश ऊत्सव निमित्त नेवासा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य तसेच गणेशऊत्सव साजरा करणारे तरुण मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक   आयोजित करण्यात आली  होती.या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिक्षक श्री.मुंडे साहेब,तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.बाजीराव पोवार साहेब,तसेच पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.शिवाजीराव कोलते व तालुकाध्यक्ष श्री.आप्पासाहेब देशमुख व नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच शांतता कमिटीचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते.सदर गणेशऊत्सव शांततेत व शासनाच्या नियमांनुसार साजरा करण्यात यावा व कोरोंना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करावा अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक साहेबांनी केल्या.सदर मिटिंगमध्ये पोलीस पाटील श्री.आदेश साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे मनोज पारखे ,शिवसेनेचे नितीन जगताप  तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment