अकरा लाखाच्या गुटख्यासह तीन आरोपींना अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

अकरा लाखाच्या गुटख्यासह तीन आरोपींना अटक.

अकरा लाखाच्या गुटख्यासह तीन आरोपींना अटक.

नगर - राज्यामध्ये गुटखा बंदी असताना सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर आज शहरातील कोठला  परिसरामध्ये धाड टाकून सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.  

आनंत विलास भालेकर वय 39 रा. तेरखेडा ता. वाशी  ( मारुतो डिझायर कार नंबर एम एच 25 एल 7773 वरील चालक),  जमीर अब्दुल सत्तार मुला वय 38 वर्षे रा. तेरखेडा ता. वाशी  ,  अविनाश चंद्रकांत हालकरे वय 30 रा. तेरखेडा ता. वाशी अशी आरोपींची नावे आहे.


राज्यामध्ये गुटखा  बंदी असताना देखील सुद्धा या अगोदर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केलेल्या आहे नगर शहरामध्ये कोठला परिसरामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री साठी काहीजण येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अनील कटके व त्यांच्या पक्षाने या ठिकाणी , नगर शहरामध्ये काही जण हे कोटला चौक, फलटण चाकी समोर मारुती स्विफ्ट नं. एमएच-25-एल-7773 या गाडी मधून आले होते, ते  गुटखा विक्री करण्यासाठी स्टेट बँक चौकाकडून घेवून येत आहेत.  कोटला चीक, फलटण चौकी समोर या ठिकाणी जावून सापळा लावला .कारची झडती घेतली असता कारमध्ये रु 9,80,968 सुपारी मिश्रीत पानमसाला, वि - 1 तंबाखू कंपणीचे तंबाखू व मारुती डिझायर कंपणीची पांढर्‍या रंगाची कार असा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला बाबत व वाहनांचे मालकाबाबत ताब्यात आनंत विलास भालेकर याला विचारपूस केली असता त्यांनी मारुती डिझायर कार नंबर एम एच 25 एल 7773 ही माझ्या मालकीचे आहे व त्यामध्यील मालक जमील शेख रा. तेरखेडा ता. वाशी (फरार) (पुर्ण नाव माहित नाही ) याचे मालकीचा असल्याचे सांगीतले.

सदरची कारवाई. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, विशाल दुमे, उपविभागीय पोलीस अधीकारी, शहर विभाग व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.त्यांनंतर पथकातील सपोनि गणेश इंगळे, सोभनाथ दिवटे,  मन्सूर सय्यद,  दिनेश मोरे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, कमलेश पाथरुट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

No comments:

Post a Comment