पोपटराव पवारांच्या हस्ते अशोक कुटेंना 'मार्केंडेय गुरु गौरव' पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 9, 2021

पोपटराव पवारांच्या हस्ते अशोक कुटेंना 'मार्केंडेय गुरु गौरव' पुरस्कार प्रदान

 पोपटराव पवारांच्या हस्ते अशोक कुटेंना 'मार्केंडेय गुरु गौरव' पुरस्कार प्रदान


अहमदनगर  :
दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी पद्मश्री मा पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान ट्रस्ट, पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट, नगर जल्लोष परिवार ट्रस्ट,पद्मनादम ढोल ताशा पथक आणि पद्मशाली महिला शक्ती परिवार अहमदनगर द्वारा भारतीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित 'मार्कंडेय गुरू गौरव पुरस्कार' नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व प्राथमिक शिक्षक अशोक  पांडुरंग कुटे यांना प्रदान करण्यात आला. 
यावेळी विचारपीठावर अहमदनगरच्या महापौर सौ रोहिणी संजय शेंडगे, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विद्याधर पवार ,माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक मनोज दुलम, राष्ट्रवादीचे लोकनेते सचिन जगताप, माजी नगरसेवक धनंजय जाधव, श्रीनिवास बोज्जा, अरुण अमृतवाड, २ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ अमोल बागुल, नगर जल्लोष चे सागर बोगा, दीपक गुंडू, योगेश ताटी, अजय म्याना, सौ आशा दोमल, सौ सुरेखा आडम आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
    मा पोपटराव पवार यांनी त्यांच्या मनोगतात कुटे सरांच्या कार्याचा गौरव करून अशोक कुटे व जयश्री कुटे या दांपत्याला एकत्रित पुरस्कार प्रदान केला. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती अहमदनगर जिल्हा समन्वयक तसेच मराठा व मराठी सोयरीक संस्था या माध्यमातून या दाम्पत्याचं बहुमोल असं समाजकार्य सतत चालू आहे.  एकल महिला पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार शासनाने 'मिशन वात्सल्य' नावाची महत्वपूर्ण योजना एकल (विधवा) महिला व अनाथ मुलांसाठी सुरू केली आहे. जयश्री कुटे ह्या कृषी सहाय्यक व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या असून त्यांनी आत्तापर्यंत महिलांसाठी व कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य केले आहे. सरांनी व त्यांच्या टीमने पुनर्वसन समितीमार्फत रक्षाबंधन, एकल महिलांना गृहभेटी, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, अनाथ मुलांचे फी माफीचे प्रस्ताव भरणे हे कार्य  मोठ्या प्रमाणात केले आहे. तसेच मराठी सोयरीकच्या माध्यमातून आत्तापर्यंत तीन हजार लग्न जमले व पार पडलेत. तसेच कोरोना काळामध्ये 15 दर्जेदार बेड वाटप, कोव्हिड सेंटरला किराणा, मेडिकल साहित्य वाटप, पेशंटची बिले दवाखान्यात जावून कमी करणे, पूरग्रस्तांना जागेवर मदत देणे, कुटुंबातील सर्वांचे व मित्रांचे  वाढदिवस दरवर्षी अनाथाश्रमात साजरे करणे इ. विविध सामाजिक कार्य त्यांनी केलं आहे.
मराठा सेवा संघ ,उद्योजक लॉबी, जिजाऊ ब्रिगेड इत्यादी अनेक वेगवेगळ्या संघटनेत दोघांचा सक्रिय सहभाग असतो 

No comments:

Post a Comment