वाकोडी येथील महाविद्यालयाला शिक्षणमहर्षी शरदराव तोडमल नामकरण करा- शिवाजी कर्डीले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

वाकोडी येथील महाविद्यालयाला शिक्षणमहर्षी शरदराव तोडमल नामकरण करा- शिवाजी कर्डीले

 वाकोडी येथील महाविद्यालयाला शिक्षणमहर्षी शरदराव तोडमल नामकरण करा- शिवाजी कर्डीले

दिवंगत नेते शरदराव तोडमल (भाऊ) यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः न्यू इंग्लिश स्कूल वाकोडीचे  शिक्षण महर्षी शरदराव तोडमल इं
ग्लिश स्कूल वाकोडी असे नामकरण करण्यात यावे म्हणजे शरदरावांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असे गौरोउद्गार  माजी मंत्री शिवाजी राव कर्डिले यांनी काढले आहे.

दिवंगत नेते शरदराव तोडमल (भाऊ) यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा रविवार दि.5 सष्टेंबरला योग शिक्षक दिन रोजी सकाळी 8:00 वा  मान्यवर व आप्तेष्टांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कर्डीले बोलत होते चि. आबासाहेब तोडमल, सचिन मुले व सुना सुवर्णा, तनुजा मुलगी चारुशीला जावई प्रकाश कलके पत्नी शकुंतला(ताई) नातू कौश्तुभ, पृथ्वीराज, उदय, विकास (विक्की),निखील, नात, मानसी, बंधू संपत भाऊजई मंगल पुतणे, अमोल, कुणाल, इंद्रजीत,अमित, मयूर. पुतणी नुतन, प्राची, या सपूर्ण कुटुंबासमवेत भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप, धुपाने, व गंधकाणे पूजन करून, श्रद्धांजली अर्पण केली. मधुबन मंगल कार्यालय येथे कीर्तन व शोकसभा आणि श्रद्धांजली व पसायदान कार्यक्रम आयोजितकरण्यात आला होता.

बालयोगी अमोल महाराज जाधव यांचे कीर्तन 9 :30 वा श्री संत तुकाराम अभंग गाथेतील‘’ वैष्णव तो जया अवघी देवाची माया या अभंगातील ओवीने भाऊंचा संपूर्ण जीवन पट आपल्या मधुर वाणीने प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थिताना समजावून सांगितला कीर्तनाला साथ संगत संतोष शिंदे भजनी मंडळ यांनी उकृष्ट साथ दिली.आणि त्याच ओवीतील वैष्णव ‘’ राष्ट्संत व्द्रीनाथ महराज तनपुरे यांनी भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  वैष्णव ‘’ या शब्दावर भाऊंच्या वारकरी या जीवनावर आपली मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

माजी आमदार आष्टी पाटोदा तालुक्याचे साहेबराव दरेकर यांनी श्रद्धांजलीवर आपले मनोगत व्यक्त करताना 1977 सालापासून आमदार दादापाटील शेळके

याचे खरे समर्थक, विश्वासू आणि त्यांच्या  पाऊलावर पाऊल टाकण्याचे काम चि. आबासाहेब आणि सचिन यांनी करण्याचे मनोगत व्यक्त केले. आपले गुरु व मार्गदर्शक कै. दादा पाटील शेळके यांचे खरे समर्थक व निष्टावंत नेते होते .जसे अहमदनगर मार्केट कमिटीचे पण नामकरण कै. दादा पाटील शेळके केले

त्याच धर्तीवर शिक्षण महर्षी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी नावाचे नामकरण शरदराव तोडमल करावे म्हणजे त्यांच्या कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असे उदगार काढून हि खरी श्रद्धांजली राहीलअसे ते म्हणाले. श्रद्धांजली व शोक सभेच्या भाषणात व मनोगतातून भाऊंच्या कार्य कर्तुत्व व नेर्तुत्वा वर जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके , जिल्हा बँकेचे माजी संचालक

रावसाहेब पाटील शेळके ,शशिकांत गाडे सर, जिल्हा शिवसेना नेते, माजी चेअरमन जिल्हा दुध संघ अहमदनगर दादाभाऊ चितळकर रामचंद्र, मांडगे, भगवानराव बेरड तसेच माजी व्हा. चेरमन व संचालक किसनराव लोटके सर ,हौसिंग सोसाईटीचे माध्यम कर्ज पुरवठा जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कार्ले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याधापक रोह्कले सर वाकोडी परिसर ग्रामीण विकास संस्थेचे संचालक बाळासाहेब कराळे , बाबासाहेब कोरडे, माध्यमिक शिक्षक सिसायटीचे माजी चेअरमन बी.के पाटील, माजी संचालक कल्याणराव ठोंबरे विद्यमान संचालक बाबासाहेब बोडखे, नानासाहेब शिंदे सर माजी सभापती पंचायत समिती नगर सूर्यभान पोटे, संतोष म्हस्के उध्वराव अमृते, दहिगाव चे सरपंच मधुकर म्हस्के श्रीराम ट्रस्ट दहिगावचे अन्शाबापू म्हस्के सहसचिव जेष्ठ नागरिक संघ मोहनराव कदम सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पाचे साहेब अश्या मान्यवरांनी श्रद्धांजली वर आपले मनोगत व्यक्त केले. माजी प्राचार्य धस सर यांनी शिक्षण व आजचा शिक्षण दिन आणि भाऊंची शिक्षणावरील निष्टा या विषयावर श्रद्धांजलीवर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भाऊंचा राजकीय, समाजिक, धार्मिक विशेषकरून शैक्षनिक क्षेत्रातील हजोरोच्या नातलक आप्तेष्ट व मित्र परिवार उपस्थित होते. कार्यक्रमास आवर्जून श्री संत तनपुरे बाबा माध्यमिक स्टाफ विद्याल्याचेमुख्यध्यापक मोरे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.संपूर्ण कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी विद्यालयाचे मुख्य्धापक श्री काळे सर व त्यांचा स्टाफ यांनी नियोजन व आयोजन केले सूत्र संचलन श्री झाडे सर व कराळे सर यांनी उकृष्ट केले.बालयोगी अमोल महाराज जाधव यांनी आपल्या मधुर वाणीतून पसायदान घेवून स्नेहभोजन नंतर कार्यक्रमाची सांगता केली.पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला.

No comments:

Post a Comment