डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची टाकळीभानमध्ये कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची टाकळीभानमध्ये कारवाई.

 डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची टाकळीभानमध्ये कारवाई.

अवैद्य गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा.


श्रीरामपूर -
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींवर कारवाई केली आहे.
डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आले असुन त्याचा नाश करण्यात आला. आरोपी संजय कारभारी गांगुर्डे रा माळेवाडी टाकळीभान व गणपत डुकरे रा टाकळीभान (फरार) यांचेकडुन 42,00 रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन 2500 रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची जप्त करण्यात आली.आरोपी शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान यांचेकडुन 31,500 रु. कि.चे 450 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन 2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची तसेच आरोपी आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान यांचेकडुन 35,000  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन 2000 रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची जप्त करण्यात आली. एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून या कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  ऊू.ी.ि. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले. ही कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  ऊू.ी.ि  संदीप मिटके, -.ी.ख.राजेंद्र आरोळे,क.ल. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  निखिल मसराम, मारुती माळी म.पो.कॉ. प्रज्ञा डोंगरे, पल्लवी तुपे व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment