शेंडी बँकेतील दरोडेखोर पोलिसांना शरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

शेंडी बँकेतील दरोडेखोर पोलिसांना शरण.

 शेंडी बँकेतील दरोडेखोर पोलिसांना शरण.

आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी? ग्राम सुरक्षा यंत्रणेचे सादरीकरण.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील शेंडी गावातील इंडियन ओवरसिज बँकेत बुधवारी सकाळी नियमित कामकाज सुरु असतानाच अचानक तीन अज्ञात हत्यारबंद इसमांनी बँकेत प्रवेश करून खळबळ उडवून दिली. बँकेशेजारील दुकानदाराने तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला आणि सगळ्यांना सतर्क केलं. दहा मिनिटांत गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी बँकेला घेराव घातला. पोलिसांनी दरोडेखोरांना वारंवार आवाहन केल आणि दरोडेखोरांनी शरणागती पत्करली.  या प्रकारामुळे शेंडी गावात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. मात्र संपूर्ण प्रसंगानंतर खुलासा झाला की एमआयडीसी पोलिसांनी मॉकड्रील करून आपत्कालीन परिस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कशी कार्यान्वीत करायची याचे सादरीकरण केलं.
ग्रामीण भागात वस्त्यांवर चोर्‍या दरोड्याचे प्रकार झाल्यावर आधुनिक तंत्रज्ञानातून सुरक्षा यंत्रणा कशी सक्रिय करायची यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखली असे मॉकड्रील विविध गावात आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षितीतेची भावना वाढण्यास मदत होत आहे. या मॉकड्रीलबाबत पोलिस अधिकारी अनिल कटके, दत्तात्रय गोर्डे यांनी माहिती दिली. या मॉकड्रीलसाठी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे  सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे तसेच सर्व कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामसुरक्षा यंत्रणा टोल फ्री क्रमांक - 18002703600

No comments:

Post a Comment