दिल्लीतून साई सेवा म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

दिल्लीतून साई सेवा म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत

 दिल्लीतून साई सेवा म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी भागात मुसळधार वृष्टीमुळे कोयना, कृष्णा नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले होते. अशा पुरग्रस्तांसाठी राज्यासह देशातून मदतीचा ओघ सुरू असतांना दिल्लीतील अनेक साई बाबा मंदिर संस्थानने सुमारे एक कंटेनर भरून कपड्यांचे दान गुरुवारी साई सेवक म्हणून शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती राहुल गोंदकर यांनी दिली आहे.
कोकण भागातील चिपळूण, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर भागातील नद्यांनी रुद्र धारण केले होते. तिथे त्या पुरात अन्न, वस्त्र आणि निवारा हरपला होता. त्यानंतर आज ही त्या भागात अन्न आणि वस्त्रांची निकड भासत आहे.सोशल व प्रसारमाध्यमातून समोर आले होते. याची माहिती राहुल गोंदकर यांच्या कडून दिल्लीतील  संस्थानने वारंवार माहिती घेऊन प्रत्यक्षात वस्त्रांची गरज असल्याने प्रकर्षाने जाणवले. म्हणून या संस्थेने पुरग्रस्तांसाठी चांगल्या प्रतीचे सर्वच गटातील नागरिकांसाठी मदत गोळा केली. त्या कपड्यांची इस्त्री करून चांगले करून तब्बल एक कंटेनर भरून पाठवण्यात आले होते.
यामध्ये पुरुषांच्या सुमारे  3 हजार 280 पॅन्ट जोड, महिलांसाठी 3 हजार 929 ड्रेस, लहान मुलांसाठी 2 हजार 900 सेट, 700 साड्या, पुरुषांचे शर्ट 1 हजार 300 तसेच यामध्ये खिडक्याचे पडदे, बूट, बॅगा, उशांच्या खोली आदीसह कपडे पाठविण्यात आहे. अशा जवळपास 558 बॅगा पाठवल्या आहेत.
याप्रसंगी साई संस्थांनचे माजी विश्वस्त सचिन तांबे म्हणाले की, साईभक्त अडचणीत सापडल्यानंतर भक्तांना नेहमीच साईबाबाकडे याचना करत असताना अशा पुरग्रस्तांची ही याचना बाबांनी ऐकली म्हणून या संस्थेने इतक्या मोठ्या प्रमाणात शिर्डीत पाठवली आहे. लवकरच ही मदत पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा संघटक कमलाकर कोते म्हणाले की, संकट आणि साईबाबा हे समीकरण गेल्या कित्येक वर्षात शिर्डीत अनुभवयास मिळाले आहे. कोरोनाच्या काळात भक्तांच्या निष्काम भावनेतून शिर्डीच नाव अग्रक्रमाने राहिलेले आहे. त्यामुळे लवकरच आज ही पुरग्रस्तांची परिस्थिती वाईट आहे. ह्या संस्थेने दिलेली मदत त्यांच्यापर्यंत आम्ही शिर्डीकर प्रयत्न करून तिथपर्यंत मदत पोहचवू असे कोते म्हणाले.
याप्रसंगी ग्रीन एन क्लिनचे अध्यक्ष अजित पारख यांचा भारतीय संस्कृती पद्धतीप्रमाणे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मणीलाल पटेल, निलेश कोते, संदीप सोनवणे, नितीन उ. कोते, सुनील बारहाते, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब जगताप, आदीसह मान्यवर उपस्थित होते. यासाठी शिरडी साई टेम्पल सोसायटी, साईधाम, फरीदाबाद व शिरडी साई रसोई, रोहिणी ट्रस्ट, दिल्ली यांनी ही मदत दिली आहे.

No comments:

Post a Comment