पारनेर येथील डॉ.सायली श्रीकांत खोडदे यांच्या हॉस्पिटलला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सदिच्छा भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

पारनेर येथील डॉ.सायली श्रीकांत खोडदे यांच्या हॉस्पिटलला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सदिच्छा भेट

 पारनेर येथील डॉ.सायली श्रीकांत खोडदे यांच्या हॉस्पिटलला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सदिच्छा भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी व परिसरातील 11 गावांचा पाणी योजना राबवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
पारनेर येथील डॉक्टर सायली श्रीकांत खोडदे यांच्या हॉस्पिटलला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ आबासाहेब खोडदे यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना पाणी योजनेचे आश्वासन नामदार पाटील यांनी दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष तात्या फाळके, आमदार निलेश लंके, डॉ आबासाहेब खोडदे, राष्ट्रवादी युवानेते श्रीकांत खोडदे, डॉक्टर सायली खोडदे, शिंदे सर, संपतराव कळसकर, मारुती शिंदे, इंद्रभान गाडेकर, दादाभाऊ गाजरे आदी यावेळी उपस्थित होते.
नामदार पाटील यावेळी म्हणाले गेली दोन वर्षात आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत, आमदार लंके कधीही मुंबईत आले की पाच पन्नास लोकांचे शिष्टमंडळ सातत्याने त्यांच्या बरोबर असते व ते कामे घेउन येतात व मतदारसंघाच्या विकासासाठी ते सातत्याने मोठा निधी आणतात हीच त्यांची खासियत आहे, आजपर्यंत मतदारसंघाचा विकास करताना समाजाभिमुख काम त्यांनी केले आहे, राळेगणसिद्धी व परिसरातील 11 गावांच्या पाणीयोजनेचा पाठपुरावा आमदार लंके व डॉ आबासाहेब खोडदे व त्यांच्या सहकार्‍यांनी सातत्याने आपणांकडे केला असून याचा विचार राज्य सरकार करीत असून ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली आहे.
डॉक्टर सायली खोडदे ही आमची सांगलीची कन्या असून हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ सायली हिचे काम सामाजिक असून पारनेर तालुक्यातील जनतेची सेवा डॉक्टर सायली ही करीत असून सांगलीकरांना ही बाब अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले, आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नामदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला,
राष्ट्रवादी युवानेते श्रीकांत खोडदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी डॉक्टर आबासाहेब खोडदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment