यशवर्धन खिलारी याची उच्च शिक्षणासाठी निवड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

यशवर्धन खिलारी याची उच्च शिक्षणासाठी निवड.

 यशवर्धन खिलारी याची उच्च शिक्षणासाठी निवड.

इस्रायलमधील आंतरराष्ट्रीय शाळेची मिळाली शिष्यवृत्ती.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील यशवर्धन भाऊसाहेब खिलारी याचीउच्च माध्यमिक शिक्षणासाठी इस्रायल मधील इस्टर्न मेडीटेरीयन इंटरनँशनल स्कूल येथे निवड झाली आहे.ही शाळा इस्रायल देशाचे आर्थिक केंद्र असलेले तेल अविव मधील हाफकर हेऑर्क येथे आहे.
तेथे तो इंटरनँशनल डिप्लोमा बक्यालुएट सर्टिफिकेट या 2वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी आंतरराष्ट्रीय संबंध,अर्थशास्त्र, जागतीक राजकारण याविषयांशी निगडित अभ्यास तो करणार आहे.
या शिक्षणासाठी पुढील 2 वर्षाकरीता त्याला इस्रायल सरकारची 50 लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.यशवर्धन हा टाकळी ढोकेश्वर येथील सावली परीवाराचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब खिलारी वस्रीरोगतज्ञ डॉ. स्वाती खिलारी यांचा मुलगा असुन जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी यांचा नातु आहे.
यशवर्धन याचे माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथील कर्नल परब स्कूल येथे झाले आहे. विद्यालयाचे प्राचार्य कर्नल दिलीप परब व सौ.गिता परब मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशवर्धन याची  या इंटरनँशनल स्कुलसाठी निवड झाली आहे.
यशवर्धन याचे भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पा. तसेच खा.सुजयदादा विखे पा.यांनी अभिनंदन केले आहे. यशवर्धन याने मिळविलेल्या यशाने ग्रामीण भागातील मुलांना परदेशातील शिक्षणासाठी मार्ग उपलब्ध झाला आहे त्यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment