गावगाड्यात लोकभावनेला केंद्रबिंदू माना ः सालके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

गावगाड्यात लोकभावनेला केंद्रबिंदू माना ः सालके

 गावगाड्यात लोकभावनेला केंद्रबिंदू माना ः सालके

जवळ्यात 15 व्या वित्त आयोगातून विविध विकासकामे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः गावगाडा हकताना ग्रामपंचायतीला दररोज अनेक अडचणींना सामोरे जात मार्ग काढत सर्व समावेशक विकास कामे करावी लागतात ती विकास कामे करताना लोकभावना व लोकांची गरज लक्षात घेऊन कामे केल्यास गावगाडा योग्य रीतीने चालण्यास मदत होते असे मत सेवा संस्था अध्यक्ष शिवाजीराव सालके यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले
दि 29 ऑक्टो रोजी सकाळी भैरवनाथ मंदिर ते सुतार गल्ली पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण काम व भैरवनाथ अंगणवाडी संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावितीरिक्त आदी 15 वित्त आयोगातून सात प्रकारची विकास कामे ही मंजूर झाली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी  शिवाजी खामकर यांनी दिली सदर कामांचे भुमिपुजन सरपंच अनिता आढाव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व सद्स्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच गोरख पठारे  ग्रा सदस्य कानीफ पठारे,, रमेश सालके,,संदीप पाटील माजी सरपंच सुभाष आढाव बाबाजी लोखंडे ग्रा सदस्य प्रा , सोनाली सालके  संदीप सालके,, अमोल सालके, उपस्थित होते

No comments:

Post a Comment