आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

 आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय असे प्रतिपादन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले मी आता नवीन आलो आहे परंतु कोठारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय कोठारी यांची माहिती मला अगोदरच मिळाली आहे त्यांचे सामाजिक कार्य फार चांगल्या प्रकारे चालले असून त्यांच्या हातून अशीच सेवा घडो असे ते म्हणाले
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली व जामखेडच्या कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक रक्तदात्याला दोन लिटर पेट्रोल किंवा डिझेल देण्यात आले असल्याची  माहिती कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सामाजिक कार्यकर्ते आणि प्रफुल्ल सोळंकी समवेत बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी  यांनी केले होते यावेळी सर्वात प्रथम पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी रक्तदान केले असून बर्‍याच लोकांनी रक्तदान केले आहे
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, कोअर कमिटीचे सदस्य उमरभाई कुरेशी, ज्येष्ठ नेते हरिभाऊ आजबे, मा.ग्रा.पं.सदस्य ईस्माईल सय्यद, संजय डोके,अमोल गिरमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अपंग सेलचे ता.अध्यक्ष बाबुराव भोसले, महेश सोळंकी
 प्रा.राहुल आहिरे, समीर चंदन,दादा महाडिक, सचीन शिंदे, ऋषी कुंजीर, इमरान तांबोळी  आदी उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी  सकाळी नऊ वाजता जामखेड़ चे तहसील मा योगेश चंद्रे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले.  प्रमुख पाहुणे म्हणून  वैद्यकिय अधीक्षक डॉ संजय वाघ , पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड ,  मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते  हे उपस्थितित . रक्तदानाची सूरवात झाली
रक्तदात्यास दोन लिटर पेट्रोल किंवा दोन लिटर डिझेल देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या युवकांना येण्याजाण्यास स्वतःचा खर्च होऊ नये म्हणून पेट्रोल देण्याची संकल्पना असल्याचे  प्रफुल्ल सोळंकी यांनी सांगितले.
कोठारी प्रतिष्ठान मार्फत 25 वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत बर्‍याच लोकांचे प्राण वाचवले आहेत . सध्या  कोरोना काळामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. प्रत्येकाने रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले होते याला लोकांनी प्रतिसाद देत रक्तदान केले.बार्शी येथील श्रीमान राम भाई शहा रक्तपेढी यांचे अजित सेठ कुंकूलोळ यांनी खूप सहकार्य केले रक्तदानाच्या वेळी प्रशांत बुडुख, सुधीर सुमंत, अर्चना गुळवे ,सुप्रिया लगदिवे ,अनुराधा डोंगरे, बापू ननवरे ,किरण जाधव ,बलराम कोकाटे ,ताजुद्दीन सय्यद, अर्जुन दळवी यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment