हिवरे कोरडा गावात एकाच दिवसात 300 लसीकरणाचा टप्पा पार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

हिवरे कोरडा गावात एकाच दिवसात 300 लसीकरणाचा टप्पा पार

 हिवरे कोरडा गावात एकाच दिवसात 300 लसीकरणाचा टप्पा पार

सरपंच उज्वला कोरडे यांचा पुढाकार, गावकरी यांनी मानले आरोग्य अधिकारी यांचे आभार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः मौजे हिवरे कोरडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आज दि.  09/09/2021 रोजी एकाच दिवसात 314 लोकांचे लसीकरण करून आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून गावातील शेवटच्या घटकापर्यंत लस देण्याचे काम अतिशय शांततेत पार पडले.
या कामी गावचे सरपंच सौ.उज्वला दत्ता कोरडे व उपसरपंच सौ.सपना बबन अडसूळ, सदस्या सौ.रोहिणी विकास वाळुंज, सौ.ज्योती अनिल घंगाळे, श्री. संतोष देवराम ज-हड, शकील शेख, सौ. मंगल संतोष अडसूळ, श्री. सुदाम कोरडे, श्री.सुभाष माळी सर्वांनी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले.
हिवरे कोरडा गावासाठी 300  लस उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी सौ. मानसी मानुरकर मँडम यांचे व सदर लसीकरण प्रक्रियेत डॉ. प्रतीक सरदार ,आरोग्यसेवक श्री. संतोष महांडुळे, श्री. कोल्हे, आरोग्यसेविका सौ. संध्या शिंदे, सौ. वडवल्ली, मदतनीस सौ.साधना अडसूळ, आशासेविका सौ. प्रमिला घंगाळे, अंजुम शेख प्रा.शिक्षक श्री. साठे सर, श्री.सुंबे सर, ग्रा. पं. कर्मचारी सय्यद यांच्यासह लॅपटॉप घेऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरज थोरात, प्रकाश धोत्रे, संतोष अडसूळ, शुभम कोरडे तसेच समाजसेवक संतोष मल्हारी कोरडे, शशिकांत अडसूळ, दत्ता कोरडे, आणि सर्व तरुण सहकारी मित्रांनी अतिशय चांगले सहकार्य व उत्तम नियोजन करून एक आदर्शवत काम केल्याबद्दल ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य यांनी लसीकरण प्रक्रियेत योगदान देणार्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.

No comments:

Post a Comment