लसीकरणाच्या माध्यमातून प्रभाग 4 कोरोना मुक्त करणार ः बोरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 20, 2021

लसीकरणाच्या माध्यमातून प्रभाग 4 कोरोना मुक्त करणार ः बोरकर

 लसीकरणाच्या माध्यमातून प्रभाग 4 कोरोना मुक्त करणार ः बोरकर

प्र. क्र.4 मध्ये नागरिकांसाठी मोफत लसीकरणा कॅम्पचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांनाचे लवकरात-लवकर कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी प्रभागांमध्ये लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वय वर्ष अठरा पुढील नागरिकांचे लसीकरण करून प्रभाग कोरोना मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य आबादित राहण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी व्यक्त केले.
        प्रभाग क्रमांक चारमध्ये पंकज कॉलनी येथे गणेश मित्र मंडळाच्या वतीने कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर,पंकज कॉलनीचे अध्यक्ष सतीश मामा गुंफेकर,रोहन खिलारी,प्रसाद गोरे, अभिजित जाधव ,दीपक परदेशी, विजयकुमार म्हस्के, दीपक येरी,वैभव झोटिंग,हर्षल बांगर,हृषीकेश सोले, आशुतोष देशपांडे,संजय जाधोर, राहुल जाधव,प्रशांत कराड,तेजस बोरुडे,प्रतीक भोगे,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment