कला शिक्षकाने केली चित्र गणेशाची स्थापना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

कला शिक्षकाने केली चित्र गणेशाची स्थापना

 कला शिक्षकाने केली चित्र गणेशाची स्थापना

प्रदुषण टाळण्यासाठी कला शिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांचा अनोखा उपक्रम..!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व पाबळ कवडे वस्ती येथील रहिवासी  ज्ञानेश्वर रामदास कवडे त्यांनी स्वतः गणेश मुर्ती चे फलकावर सलग सात तास रंगीत खडूने रेखाटन करत चित्रगणपती साकारला व त्या फलक चित्रगणेशाची स्थापना त्यांनी आपल्या घरी केली आहे.
ही संकल्पना त्यांना त्यांचे धुळे येथील सन्मित्र कलाशिक्षक प्रल्हाद सोनार यांनी सुचविली ते सातत्याने गेली अनेक वर्ष अशा पद्धतीने चित्र गणेशाची स्थापना करत असतात. त्यांच्या कडून प्रेरणा घेत ज्ञानेश्वर कवडे सरांनी चित्र गणेशाचे रेखाटन केले  निश्चितच पर्यावरणाला घातक असणार्‍या प्लास्टिक ऑफ पॅरिस च्या मुर्तीचा वापर आपण टाळू शकतो व पर्यावरणाचे रक्षण आपण करू शकतो. या प्रमाणे आपण या चित्र गणेशाचे चित्रण करत वेगवेगळे संदेश जनमानसांपर्यंत पोहचू शकतो. सध्या ग्रामीण भागा मध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढू पाहत आहे परंतू सर्वांनी कोरोना विषयक शासकीय नियमांची अमंललबजावणी करावी तसेच लसीकरण झाले नसेल तर लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व सुरक्षित अंतर ,मास्क वापर, सतत हात धुणे या त्रिसुत्री चे आचरण करावे हा संदेश कवडे सरांचा चित्र गणेश देत आहे.
अशा पद्धतीने थोडी संकल्पना वेगळी आहे परंतू आपण कागदावर कपड्यावर गणेश चित्र निर्मिती करून चित्र गणेशाची स्थापना करून पर्यावरणपूरक चित्र गणेशा स्थापन करू शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here