ओपन स्पेसच्या सुशोभिकरणाने नगरच्या वैभवात भर ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

ओपन स्पेसच्या सुशोभिकरणाने नगरच्या वैभवात भर ः आ. जगताप

 ओपन स्पेसच्या सुशोभिकरणाने नगरच्या वैभवात भर ः आ. जगताप

कल्याण रोडवरील बारवेजवळील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील मुलभुत सुविधांबरोबर प्रत्येक भागातील ओपन स्पेसचे सुशोभिकरण झाल्यास शहराच्या वैभवात भर पडणार असून, त्यासाठी प्रत्येक भागातील ओपन स्पेसचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करुन वृक्षसंवर्धन केले पाहिजे. परिसरातील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपणासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपला परिसर सुंदर, स्वच्छ हरित करण्यासाठी  प्रयत्न व्हावेत.  कल्याण रोडवरील या ओपन स्पेसचा नियोजनबद्ध विकास करुन या ठिकाणी वृक्षारोपण, बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. त्यासाठी आपण सहकार्य करु, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शिवक्रांती मित्र मंडळाच्यावतीने बाळाजी बुवा बारवेजवळील ओपन स्पेसमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानदेव पांडूळे, अरविंद शिंदे, काका शेळके, भूषण गारुडकर, शरद दातरंगे, रामचंद्र धारक, शुभम दातरंगे, राजू दातरंगे, संदिप दातरंगे, सनी आगरकर, राज कोंडके, गौरव आस्मर, अनमोल वाडेकर, वितेश घोडके, ईश्वर गारुडकर, वैभव वाघ, राम वाघ, संतोष लांडे, अशोक दातरंगे, गणेश दातरंगे, संतोष औशीकर, सनी शिंदे आदि उपस्थित होते.
भूषण गारुडकर म्हणाले,  या भागातील या ओपन स्पेसमध्ये आज आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले आहे. त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पुढील काळात सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. शिवक्रांती मंडळाच्यावतीने महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करु. नागरिकांच्या सहभागातून या ओपन स्पेसचा विकास करण्यात येईल, असे सांगितले.
याप्रसंगी ज्ञानदेव पांडूळे, अरविंद शिंदे, काका शेळके आदिंनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment