पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच देण्याच्या आश्वासनाची पूर्ती व्हावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच देण्याच्या आश्वासनाची पूर्ती व्हावी

 पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच देण्याच्या आश्वासनाची पूर्ती व्हावी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  महाराष्ट्रातील 325 पत्रकारांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला असून महाराष्ट्र सरकारने कोरोना काळामध्ये ज्या पत्रकारांचा मृत्यू होईल त्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना 50 लक्ष रुपयांचा विमा कवच दिला जाईल असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे दिली असतानादेखील अद्यापही पत्रकारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही तरी पत्रकारांना केंद्र व राज्य सरकारकडून या परिवारासाठी मदत झालीच पाहिजे अशी मागणी करत पत्रकारांनादेखील केंद्र सरकारने मदत केली पाहिजे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे अतिशय विश्वसनीय समजले जाणारे केंद्रीय अर्थ मंत्री नामदार डॉक्टर भागवत कराड यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा करण्यात आली.
पत्रकारांना केंद्र व राज्य सरकारने विविध समित्यांवर त्यांची नियुक्ती करावी अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. दिल्लीत,भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची मंत्रालयात, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वास राव आरोटे यांनी भेट घेऊन, सत्कार केला.आणि कोरोना टाळेबंदी नंतर निर्माण झालेल्या लघु वृत्तपत्र व पत्रकारांच्या अडचणीवर सविस्तर चर्चा केली.

No comments:

Post a Comment