जामखेड शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी 2 वर्ष प्रलंबित ठेवली ः शिदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

जामखेड शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी 2 वर्ष प्रलंबित ठेवली ः शिदे

 जामखेड शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी 2 वर्ष प्रलंबित ठेवली ः शिदे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  जामखेड शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी दोन वर्ष प्रलंबित ठेवली. असा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिदे सर यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत केला.
शिदे सर यांनी जामखेड शहर व परिसरासाठी आमच्या सरकारच्या काळात सुमारे 106.कोटी रूपये ची पाणी पुरवठा योजना तांत्रिक मंजुरी घेतली होती. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत त्या आशयाचे पत्र जनतेला दाखवले होते. पंरतु सत्ता बदल झाला. विद्यमान आमदार पवार यांनी या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी दोन वर्षे प्रलंबित ठेवली. कारण की सदरची योजना माझ्या प्रयत्नांमुळे झाली हे जनतेला भासवीणयासाठी हा खटाटोप केला आहे. पंरतु जनता खरे काय आहे ते जाणून आहे. दी. 9.7.2019 रोजी मंजूर झालेली योजना लगेचच कार्यान्वित केली असती तर जामखेड करांना आज पाणी मिळाले असते. पंरतु श्रेय घेण्यासाठी दोन वर्षे योजना प्रलंबित ठेवली. असा घणाघाती हल्ला माजी मंत्री शिदे सर यांनी विद्यमान आमदार पवार यांच्या वर केला..
या योजनेसाठी लागणारी 1%रक्कम शासनाने कडे आमच्या काळात भरली होती. उजनी धरणातील या योजनेसाठी लागणारे पाणी आरक्षित करण्यात आले होते. तसा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिला होता. हे सर्व आमच्या सरकारच्या काळात झाले आहे. सर्व प्रक्रिया झाली होती. मग विद्यमान आमदार पवार साहेब मी योजना मंजूर केली आहे हे जनतेला कसे काय सांगू शकतात. हे एक मोठे आश्चर्य आहे. दोन वर्षे प्रलंबित योजना ठेवल्या मुळे त्याचे बजेट वाढले. हा जनतेला पर्यायाने शासनाच्या तिजोरी वर हा भार आहे. या विद्यमान आमदारांना फक्त भुलथाफा मारता येतात. आम्ही मंजूर केलेली काम त्याचे उदघाटन करत आहेत. एकही सिंमेट बंधारा आणला नाही. नवीन रस्ते आणले नाहीत. आम्ही काम केली. फक्त आम्ही झेंडे लावले नाहीत. ते काम आता विद्यमान आमदार करत आहेत. आमदार साहेब करोना महामारीमुळे निर्माण होणार्‍या परिस्थिती कडे दुर्लक्ष करीत आहेत. गर्दी निर्माण करतात. त्यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलिसांनी ते काम केले पाहिजे असि आमची ठाम मागणी आहे.
या प्रसंगी भाजप पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद. भगवान मुरूमकर. प्रविण चोरडिया. डॉक्टर झेंडे. डॉक्टर आलताफ शेख. शहर अध्यक्ष धनवडे कार्ले शरद. बागवान. इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment