अनधिकृत गाळे पाडत नाही तोपर्यंत, पाठपुरावा करणार - दिलीप सातपुते. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

अनधिकृत गाळे पाडत नाही तोपर्यंत, पाठपुरावा करणार - दिलीप सातपुते.

 अनधिकृत गाळे पाडत नाही तोपर्यंत, पाठपुरावा करणार - दिलीप सातपुते.

नगर बाजार समितीच्या आवारातील..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर बाजार समितीने मंजूर रेखांकणातील खुल्या जागेत 26 गाळे कुठलीही परवानगी न घेता बांधले आहेत. या अनधिकृत गाळ्यांचे नियमितीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने रेखांकनातील खुली जागा बदलता येणार नाही, विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद आहे. त्यामुळे अनधिकृत गाळे पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनधिकृत गाळे पाडत नाही, तोपर्यंत शिवसेना त्याचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
नगर बाजार समितीला अनाधिकृत गाळ्या संदर्भात शिवसेनेने तक्रार केल्यानंतर त्याची वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आलेली होती वास्तविक पाहता शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी बाजार समितीचे अस्तित्व असते, मात्र शेतकर्‍यांच्या हिताला तिलांजली देण्याचा प्रकार या सत्ताधारी मंडळींनी केला आहे, असा आरोप सातपुते यांनी यावेळी केला. महानगरपालिकेमध्ये तक्रार करण्यात आल्यावर, त्यावर सुनावणी होऊन गाळे पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला होता. गाळेधारकांनी न्यायालयामध्ये धाव घेऊन म्हणणे मांडलेले आहे. त्या अगोदर तक्रार झाल्यानंतर राज्यमंत्री स्तरावर या प्रकरणाला स्थगिती दिली होती. शिवसेनेने सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर संबंधित गाळे पाडावे, असे आदेश नुकतेच राज्यमंत्री यांनी दिलेले आहेत. ओपन स्पेसमध्ये गाळे बांधून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे, असा आरोप सुद्धा यावेळी शहर प्रमुख सातपुते यांनी केला आहे. गाळेधारकांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर न्यायालयाने कोरोना काळामध्ये तात्पुरती स्थगिती दिलेली होती. आता पुढील सुनावणी सुद्धा होणार आहे. पण दुसरीकडे महानगरपालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने रेखांकन मंजुरीननंतर खुली जागा बदलू नये, अशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आहे, असे पत्र त्यांनी बाजार समितीला दिले आहे. बाजार समितीने सदरचे गाळे नियमित करण्यासाठी रेखांकणातील दुसरी जागा ओपन स्पेस दर्शवून तसा नवी प्लॅन मंजुरीसाठी देवून हे गाळे अधिकृत करण्याचा घाट घातलेला होता. वास्तविक पाहता बाजार समितीने 26 गाळे अनधिकृत बांधलेले असल्यामुळे आता ते त्वरित पाडले जावेत, अशी आमची भूमिका आहे. आम्ही न्यायालयात सुद्धा आमचे म्हणणे सादर करणार असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा युवासेनेचे अधिकारी विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, मदन आढाव, संजय शेंडगे, सचिन शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment