मनपा महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड जाहीर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

मनपा महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड जाहीर.

 मनपा महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड जाहीर.

राष्ट्रवादी 5, शिवसेना 5, भाजपा 4, काँग्रेस1, बसपा 1..
“सभापती”पदासाठी शिवसेना व काँग्रेस मध्ये रस्सीखेच


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीची सभा मनपा सभागृहात महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5, शिवसेनेच्या 5, भाजपाच्या 4, काँग्रेस व बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येकी 1 सदस्यांची यावेळी निवड करण्यात आली. आता महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेच्या पुष्पाताई बोरुडे व काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया जाधव यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरू असून महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी असे नवे समीकरण सुरू असल्याने शिवसेनेचा या पदावर दावा असून महाविकास आघाडी म्हणून सुप्रिया जाधव यांचाही सभापती पदावर दावा आहे या दोन्ही नावांपैकी कोणाची निवड “सभापती”पदावर होईल हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी नगरसेविका मीनाताई चोपडा, मीनाताई चव्हाण,  दीपाली बारस्कर, शोभा बोरकर, परवीन कुरेशी आदींची नावे दिली तर शिवसेनेच्या वतीने नगरसेविका पुष्पा बोरुडे, कमल सप्रे, सुरेखा कदम, सुवर्णा गेनप्पा, शांताबाई शिंदे आदींची नावे देण्यात आली व भाजपच्या वतीने भाजपच्या नगरसेविका  मालन ताई ढोणे यांनी नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, आशा कराळे, सोनाली चितळे ही नावे सुचवली तर काँग्रेसच्या वतीने सुप्रिया जाधव यांचे नावे देण्यात आले. तसेच बसपा पक्षाच्यावतीने अनिता पंजाबी यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी या सर्व नावांची निवड जाहीर केली. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, नगर सचिव तडवी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर, उपमहापौरांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment