पाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

पाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता.

 पाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः
कर्जत राशीन संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे पाईप चोरी प्रकरणात राशीनच्या सरपंच नीलम साळवे यांचे पती भिमराव रामचंद्र साळवे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच सरपंच नीलम साळवे यांनी नैतिकता पाळून सरपंच पदाचा राजीनामा द्यावा व देशमुख गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी राशीन येथे राजेभोसले गट व ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पोलीस या प्रकरणात गुप्तता पाळत आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ही यावेळी करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी कैलास तरटे यांनी कर्जत राशीन संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरीस गेले असल्याची फिर्याद दिली होती, यानुसार कर्जत पोलिसांनी तपास करून आरोपी जितेंद्र हौसराव गजरमनल व प्रल्हाद बाबुराव साळवे या दोघांना अटक केली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता राशीन ग्रामपंचायतचे सरपंच नीलम साळवे यांचे पती भीमराव साळवे यांच्या सांगण्यावरून विकास विश्वनाथ साळवे याचे गॅस कटरच्या साह्याने पाणी पुरवठ्याच्या लाईनचे पाईप तोडले असून त्याची विल्हेवाट रवी भगवान साळवे यांनी लावली आहे, अशी माहिती या आरोपीनी दिली असून त्यास पंधरा दिवस होऊन ही अद्यापि या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही अथवा या बाबत योग्य ती माहितीही पोलीस देत नाहीत असा गंभीर आरोप राशीन तेथे राजेभोसले गटाचे नेते शाहूराजे भोसले व विक्रम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी ग्राम पंचायत सदस्य राम कानगुडे,  यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर जोरदार टीका करताना राशीनच्या सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अनव्ये कर्तव्यात कसूर केली व व्यवहारीक अफरातफर बाबत पदमुक्त करण्याबाबत ची कारवाई सुरू असून त्याचे पती भीमराव साळवे यांचा पाणीपुरवठा पाईपलाईन चोरी प्रकरणात थेट सहभाग असून सरपंचाचा चुलतभाऊ ही या प्रकरणात आरोपी आहे. अशा सरपंचानी त्वरित राजीनामा दिला पाहीजे. अशी मागनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू उकिरडे,  जनाबाई सायकर हर्षदा जंजिरे, युवराज राजेभोसले,  तात्यासाहेब माने, अशोक जंजिरे, मुंढे यावेळी उपस्थित होते.
पाईपलाईन चोरी प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असून अद्याप ही मुख्य आरोपीस अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत छोट्या मोठ्या सर्व बातम्या पोलीस पत्रकारांना देत असताना राज्यात गाजू शकेल अशा या चोरी प्रकरणातमात्र पोलीसा कडून गुप्तता का पाळली जात आहे असा संतप्त प्रश्न कानगुडे  यांनी उपस्थित केला.  
राशीन ग्राम पंचायत ची सत्ता असलेल्या देशमुख गटाने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून लोकांचा विश्वास तोडून सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीस सहकार्य केल्याबद्दल राशीनच्या जनते ची जाहीर माफी मागावी अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

No comments:

Post a Comment